Nashik Crime | बेरोजगार मित्रावर विश्वास ठेवणे नाशिकच्या तरुणीला ४० लाखांत पडले

0
24
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  आपल्या शालेय मित्रावर विश्वास ठेवणे हे नाशिकच्या एका तरुणीला ४० लाखांत पडले आहे. या घटनेत शाळेत सोबत शिकत असल्याच्या ओळखीवरून एका मित्राने आपल्या इंजिनिअर मैत्रिणीला बदनामी करण्याची धमकी देत दिली होती. तिच्याकडून वारंवार हा मुलगा पैशांची मागणी करत होता. यामुलाने तरुणीकडून तब्बल 40 लाखांची खंडणी मागितली आहे. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime)

Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार नशिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, खंडणी घेणारा युवक फरार आहे. अभिजित नरेंद्र आहिरे असे आरोपीचे नाव आहे. संशयित अभिजित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, संशयित अभिजितचा पोलिस शोध घेत आहेत.

Nashik News | नाशिकमधील शाळेत शिक्षकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

तर या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज सोनवणे तपास करीत आहेत. तरुणी आणि संशयित अभिजित आहिरे हे गोविंदनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. शिक्षण सुरू असतानाच तरुणी आणि संशयित अभिजितचे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडित तरुणीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नोकरीला लागली आहे. दुसरीकडे संशयित अभिजित हा बेरोजगार आहे. दोघेही एकमेकांच्या शाळेपासून संपर्कात होते. (Nashik Crime)

पीडित युवती नोकरीला असून, संशयित अभिजितने याचा गैरफायदा घेतला आहे. असे युवतीने स्पष्ट केले आहे. अभिजितने युवतीकडे गरिबी आणि इतर करणे सांगत पैसे उकळण्यास सुरुवात केली. काही काळाने संशयित युवतीकडून वारंवार पैशांची मागणी करत होता. त्याचबरोबेर प्रेमसंबंधातून काढलेले फोटो नातेवाईकांमद्धे व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पैशांची मागणी करत होता. तर, युवतीने समाजात बदनामीच्या भितीने अभिजितला पैसे दिले आहेत. पीडितेने अनेकदा कर्ज काढून संशयिताला कधी रोख स्वरुपात तर कधी ऑनलाईन स्वरूपात पैसे दिलेले आहेत. संशयिताने आतापर्यंत युवतीकडून तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

Nashik Crime | नंदुरबारच्या मुलीची नाशिकमध्ये प्रियकराने केली हत्या

नशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढत होत आहे. यात मुख्यता चोरी, खंडणी उकळणे, गुंडागिरी यांचा समावेश आहे. यामुळे नाशिकमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, नागरीकांनी यासंबंधित खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबेर असे काही घडल्यास ताबडतोब पोलिसांना काळविण्याची गरज आहे. (Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here