Skip to content

शहर पुन्हा हादरले; अंबड परिसरात युवकाचा खून


नाशिक – शहरातील अंबड लिंक रोडवरील संजीवनगर भागात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकावर धारधार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. हल्ल्यात आलम शब्बीर शेख (१९) हा गंभीररीत्या जखमी झाला होता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात हल्लेखोर फरार असून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संजीवनगर भागात जत्रा सुरू होती. याच परिसरात मागील बाजूच्या मोकळ्या मैदानातून आलम जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याला अडवून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले व तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असताना त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, नंदन बगाडे व गस्ती पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान हा हल्ला कोणी व का केला ? हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजले नाही. युवकावर खून केलेल्या अज्ञात हल्लेखोरांवर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

गेल्या दोन महिन्यात सिडको अंबड परिसरात चार खून झाले असून या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शहरात एकामागोमाग एक खुनाचे सत्र सुरू असून नाशिककरांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!