Nashik | राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम योजनेअंतर्गत येवला मतदार संघातील खिर्डीसाठे लघु पाटबंधारे तलाव व कालवा दुरुस्तीसाठी ८ कोटी व डोंगरगाव लघु पाटबंधारे तलाव व कालव्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी असा एकूण १३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी मिळाली आहे. या दोन्ही तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीमुळे परिसरातील सिंचनामध्ये वाढ होणार आहे.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम योजनेअंतर्गत राज्यातील ७५ अपूर्ण सिंचन प्रकल्पपूर्ण करणे व १५५ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणाली मध्ये सुधारणा करण्यासाठी १५ हजार कोटीं पैकी प्रथम टप्प्यातील ७.५ हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज नाबार्डकडून घेण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील खिर्डीसाठे व डोंगरगाव तलाव व कालव्याच्या दुरुस्ती करण्यात यावी यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
Deola | देवळा येथील विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मंजूर
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम योजनेअंतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या या निधीतून खिर्डीसाठे व डोंगरगाव तलावाची धरण दुरुस्ती, कालवा दुरुस्ती, अतिक्रमण काढणे, वितरिका दुरुस्ती, एस्केप गेट बसविणे, गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे यासह विविध कामांचा समावेश आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन येवला मतदारसंघातील सिंचनामध्ये वाढ होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम