लेखक – कुबेर जाधव | २० वर्षापासुन नार पारच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. खोऱ्यातील जवळपास १६५ टीएमसी पाण्यावर आधी आपलाच हक्क आहे. नेत्यांना समजावून सांगितले, आपल्या लोकप्रतिनिधींना नारपार हा प्रकल्प आणि पाण्याचे महत्वच समजले नाही किंवा त्यांना सोयर सुत्तक नाही. कारण त्यांच्या बंगल्यात तोंड धुवायला पण बिसलेरीच्या बाटल्या आहेत. पण उत्तर महाराष्ट्रातील जनता का पेटून उठत नाही..? आज उत्तर महाराष्ट्र भकास होत आहे.
रोजगार नाही, वीज नाही, पाणी नाही, विकास नाही, सहकार क्षेत्र संपले, अनेक कारखाने, सुत गिरण्या उद्ध्वस्त झाल्या, अनेक लोक बेरोजगार झाले, लाखो लोक खान्देश सोडत आहेत, रोज हजारो लोक पोटा पाण्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. तरी सुध्दा आम्हाला जाग येत नाही. राजकिय पुढारी निर्लज्ज झाले आहेत. जनता जिवंत असुन मेल्यासारखी झाली आहे. मग उत्तर महाराष्ट्राचे काय होईल..?
Nar Par Project | नार-पार प्रकल्प रद्द केल्याने गुजरात धार्जिन्या सरकारचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा उघड
खान्देशी माणुस जल शक्ती मंत्री असून..,
आज विरोधाभास बघा, खान्देशी माणुस केंद्रात जल शक्ती मंत्री आहे. १५ वर्षापूर्वी झालेला गुजरात महाराष्ट्राचा जुना करार त्यांनी उकरुन काढला. नार पार हा राष्ट्रीय प्रकल्प घोषित करायचा, गुजरातला पाणी पळवायचे. एकुण ३७ टीएमसी पाणी गुजरात नेणार, अडवलेल्या पाण्यातून ८० टक्के गुजरात, १५ टक्के मुंबईसाठी, आणि उर्वरित ५ टक्के महाराष्ट्रात. हे ५ टक्के किती असेल.? यांचा डीपीआर तयार आहे, निधी तयार आहे. सामंजस्य करार म्हणजे काय..? तो कीती फसवा आहे ते बघा.(Nar Par Project)
नारपार आम्ही गुजरातला नेणार, त्या बदल्यात गुजरात आपल्याला तापी खोऱ्यात २६ टीएमसी पाणी देणार.? आमचे खानदेशी लोकप्रतिनिधी आणि जनतेला काहीच सोयरसुतक नाही. मग तुम्ही २६ टीएमसी तापीत कसे देणार? तापी नदीचे फक्त ८० टीएमसी पाणी गुजरातच्या वाट्याला आहे. पण त्यांनी उकाई हे महाकाय धरण १८० टीएमसीचे बांधले आहे. ते १०० टक्के भरतं. पण आम्हाला आमचे पाणी आडवता येत नाही. नर्मदेवरील जवळ ४० टीएमसी पाण्यावरील हक्क आम्ही सोडुन दिला.
नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध ; आमदार डॉ राहुल आहेर
Nar Par Project | मग तुम्हाला काय मिळणार..? धत्तुरा..?
अहव्वा डांग हा जलसंपत्ती व वनसंपतीचा भाग संयुक्त महाराष्ट्रात गुजरातने लचक्यासारखा तोडुन घेतला. नार पार हे आपले शेवटचे पाण्याचे स्त्रोत जर पळवलं. तर १० ते १५ वर्षानंतर उत्तर महाराष्ट्राचे विशेषतः गिरणा खोऱ्याचे वाळवंट होईल. मराठवाडा, गोदावरी खोरे यांच्यासाठी सर्वांनाच नार पार चे पाणी हवे आहे.
आपापसात पाणी वाटपाचे काम चालु आहे. कसमादे व उत्तर महाराष्ट्राचा वाटा नाही. आम्ही वाट पहात आहोत. ५३ टीएमसी गोदावरी खोऱ्यात जाणार, मराठवाडा ५४ टीएमसी, गुजरात ४० टीएमसी. गिरणा खोऱ्यात दिले आहे फक्त १० टीएमसी. मांजरपाडा १ गेले आहे १० ते १५ टीएमसी. मग तुम्हाला काय मिळणार..? धत्तुरा..?
नारपार खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी कटिबद्ध ; आमदार डॉ राहुल आहेर
उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत..?
तुमची काही ओरड नाही. कारण नारपार प्रकल्पावर पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाेलतात. कोकणातील नेते बोलतात. मराठवाड्यातील नेते बोलतात. मग उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी बांगड्या भरल्या आहेत का..? ते का बोलत नाहीत..? त्यांना जाब विचारण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
ना. सी.आर पाटील हे मुळचे उत्तर महाराष्ट्रातील (खान्देशी) आहेत. ते केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत. परंतु ते जरी गुजरातमध्ये स्थायिक असले तरी खान्देशी माणसांच्या जीवावर ते निवडुन येत आहेत. परंतु सध्या तेही गुजरातचे मिठ खात आहेत. खान्देशी माणुस मीठाला बरोबर जागतो. म्हणजे ‘ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी’, हा नैसर्गिक नियमच आहे. (Nar Par Project)
– कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना : ९४२३०७२१०२)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम