मतमोजणीला सुरुवात पहिल्या फेरीचा निकाल थोड्याच वेळात, अंतिम निकाल 11 वाजेपर्यंत अपेक्षित

0
31

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (MVP) निवडणुकीचे (Election) मतदान काल झाले असून मतमोजणीची प्रक्रीया नुकतीच सुरु झाली आहे. प्रबळ झालेल्या या निवडणुकीच्या निकालाबात मोठी उत्सुकता लागली असून यामध्ये निफाड (Niphad) तालुक्याचे मतदान निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे निफाड तालुकाच किंगमेकर ठरेल असे चित्र आहे.

मतमोजणी साठी महावितरणचे वीज कनेक्शन बंद करण्यात येऊन जनरेटर सुरू करण्यात आले. मतमोजणी पूर्ण होइपर्यंत जनरेटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मतमोजणीत व्यत्य नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागच्या वेळी मतमोजी सुरू असताना लाईट गेली होती, म्हणून विरोधकांनी जनरेटर सुरु ठेवण्याची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here