Mumbai | पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य आणू; पत्रकार संवाद यात्रेची मुंबईमध्ये सांगता

0
19
Mumbai
Mumbai

मुंबई | येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू. पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य कसे आणता येईल, ह्याबद्दल निर्णय घेऊ, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ह्यांनी आज केले. पत्रकार आणि पत्रकारांचे नेते म्हणूनही संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांना चांगले भवितव्य असल्याचे त्यांनी सूचित केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) पत्रकार संवाद यात्रा काढली. दि. २८ जुलैस सुरू झालेल्या ह्या यात्रेची सांगता आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पाटील बोलत होते. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या सदस्य पंकजा मुंडे, वसंत मुंडे ह्या वेळी उपस्थित होते. वसंत मुंडे यांनी प्रास्ताविकपर भाषणात सर्व मागण्या मांडल्या.

“तुमच्या सगळ्या मागण्यांवर योग्य मार्ग काढू”, असा दिलासा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या संवाद यात्रेच्या माध्यमातून मी समजावून घेतल्या. वसंत मुंडे ह्यांच्या प्रस्ताविकातूनही त्या कळाल्या. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आठ दिवसांत स्वतंत्रपणे बैठक घेऊ. मागण्यांवर सविस्तर चर्चा करू आणि मार्ग काढू. अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्र असंघटितांचे क्षेत्र झाले आहे. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विद्यावेतन, आरोग्यविमा, पेन्शन, आजारपणामध्ये मदत या माध्यमांतून त्यांच्या जीवनात स्थैर्य कसे आणता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करील”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Deola | व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद पत्रकारांमध्ये – सपोनि दीपक पाटील

Mumbai | जाहिरातींचे स्वतंत्र धोरण

जिल्हा दैनिकांसाठी स्वतंत्र जाहिरात धोरण राबविण्यात येईल, असे स्पष्ट करून श्री. पाटील म्हणाले, “पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सूचनाही करण्यात येईल. राज्यसभा आणि विधानपरिषद येथे पत्रकारांचा प्रतिनिधी घेण्याची तरतूद होईल, तेव्हा त्या विषयावर बोलणे उचित राहील. एक मात्र सांगतो, वसंतरावांना चांगले भवितव्य आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास तुम्ही आवर्जून उपस्थित राहा, अशी सूचना मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांनी दिली. त्यांच्या आज्ञेनुसार कार्यक्रमास आलो. तुमचा निरोप मी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविन. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मुंबईला आल्यानंतर या संदर्भात बैठक घेऊ. पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल”.

Nashik | पोलीस व पत्रकारांच्या कार्याचा समन्वय आवश्यक- उपायुक्त मोनिका राऊत

यात्रा आणि परिवर्तन

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढल्याबद्दल मी वसंत मुंडे ह्यांचे अभिनंदन करते. त्याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या यात्रा फक्त मुंडे ह्यांनाच चांगल्या जमतात! गोपीनाथरावांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. मीही पुन्हा एक संघर्षयात्रा काढली. तेव्हाही राज्यात सत्ता बदलली. आता वसंतरावांनी पत्रकार संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मात्र आमचे सरकार कायम ठेवणारी ठरेल आणि पत्रकारांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणील.”

वसंत मुंडे ह्यांनी सर्व मागण्या मांडल्या. एक-एक पत्रकार म्हणजे मतांचा गठ्ठा आहे, ह्याचा सरकारने विचार करावा असा इशारा देऊन ते म्हणाले, “सरकारने आमच्याकडे दयेच्या आणि मायेच्या भूमिकेतून पाहावे अशी विनंती आहे. राज्य प्रेस कौन्सिलची निर्मिती करावी, अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी तरतूद करावी, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत”. संजय भोकरे म्हणाले, “पत्रकार चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. हे पत्रकारांनी संवाद यात्रेच्या माध्यमातून दाखवून दिले. आपली संघटना टिकली पाहिजे. आपण सर्व जण संघटित आहोत हे आज तुम्ही तुमच्या उपस्थितीने सरकारला दाखवून दिले”. राहुल गिरी यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विश्वास आरोटे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, समन्वयक संतोष मानूरकर, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, डिजिटल मिडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी (मराठवाडा), नितीन शिंदे (कोकण), नीलेश सोमाणी (विदर्भ) सुभाष डोके (पश्चिम महाराष्ट्र), राजेंद्र कोरके पाटील (पुणे), अनिल रहाणे (उत्तर महाराष्ट्र), कोकण विभागाचे कार्याध्यक्ष शैलेश पालकर, जिल्हाध्यक्ष नयन मुंडे (अमरावती), डॉ. प्रभू गोरे (छत्रपती संभाजीनगर),नितीन शेवाळकर ,महेश सोनकुळे, सोमनाथ जगताप,विनोद देवरे,महेश शिरोरे (नाशिक) प्रसिद्धिप्रमुख नवनाथ जाधव, प्रसिद्धी समन्वयक भगवान राऊत, राज्य सदस्य संजय फुलसुंदर आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here