Iscon : म्हणून इस्कॉन ने घातली अमोघ लीला दास यांच्यावर बंदी

0
21

Amogh das : भारतातील मोटिवेशनल स्पीकर्स पैकी एक समजल्या जाणाऱ्या अमोघ लीला दास यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) यांनी घेतला आहे. अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरनं निर्माण झालेल्या वादानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे इस्कॉनकडून सांगण्यात आल आहे.

एका भाषणामध्ये अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर मासे खाल्ल्याबद्दल टीका केली होती. यात ते म्हणाले की, एक सद्गुणी व्यक्ती कधीही कोणत्याही सजीवाचं नुकसान करू शकत नाही. त्यांनी परमहंस रामकृष्णांच्या जतो मात ततो मार्ग या शिकवणीवर उपरोधिक पणे भाष्य केले की सर्व मार्ग एकाच गंतव्याकडे नेत नाहीत.

 

त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे वाद निर्माण होऊन तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी अमोघ दास यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यात त्यांनी आम्ही इस्कॉनचा आदर करतो पण आता दास यांना थांबण्याची गरज आहे. रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा अपमान सहन केला जाणार नाही. असं म्हणत त्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली होती.

 

यानंतर इस्कॉन ने एक निवेदन जारी केल आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, दास यांचे विचार त्यांच्या मूल्यांचे आणि शिकवणीचे प्रतिनिधित्व करत नाहीत. आम्ही धार्मिक श्रद्धा आणि प्रथांबाबत कोणताही अनादर आणि असहिष्णुतेचा निषेध करतो. अपमानास्पद टिप्पण्या दास यांना अध्यात्मिक मार्ग आणि वैयक्तिक निवडीच्या विविधतेबद्दल जागरूकता नसल्याचं प्रतिबिंबित करत आहेत.

 

दरम्यान दास यांच्या चुकीची दखल घेत इस्कॉन ने त्यांच्यावर एक महिन्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे व त्यांना आमचा निर्णय सांगितला असल्याच निवेदनात सांगण्यात आल आहे. तर अमोघ लीला दास यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून आपली किती मोठी चूक झाली हे लक्षात आल्याने त्यांनी प्रायश्चित्त करण्यासाठी महिनाभर गोवर्धन पर्वतावर जाण्याचा निर्णय घेतला असून तो तात्काळ प्रभावाने स्वतःला पूर्णपणे विभक्त करेल असं इस्कॉनकडून सांगण्यात आलं आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here