Skip to content

Vendilisam : आमदार नितीन पवार यांच्या कार्यालय आणि पेट्रोलपंपाची तोडफोड


Vendilisam : राष्ट्रवादी काँग्रसेच्या अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंप व संपर्क कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना पहाटे तीन वाजता घडली. या हल्ल्यात पेट्रोल पंप व कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ४ जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना पंप व कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

कळवणच्या मानूर शिवारात हा पेट्रोल पंप आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोल न मिळाल्याने हा हल्ल्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या हल्लामागे प्राथमिक कारण समोर आले असले तरी त्यामागे इतर काही उद्देश आहे का? याचा शोध पोलिस घेत आहे. पेट्रोल – डिझले भरण्यासाठी आलेले हे चारही जण मद्याच्या नशेत होते का ? याचाही तपास घेतला जात आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसणा-यांची ओळख पटली असून ते नियमीत पेट्रोल पंपावर येत असल्याचे येथील कामगारांनी सांगितले

https://thepointnow.in/congress-strike-against-sambhaji-bhide/

पवार हे कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पंप आणि कार्यालयावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, नितीन पवार यांचे वडिल दिवंगत ए टी पवार हे तब्बल सलग सातवेळा आमदार राहिले आहेत. पवार कुटुंबाचे मूळ गाव हे कळवण हेच आहे. असे असताना त्यांचे वर्चस्व असलेल्या भागात काही जणांनी हल्ला केला आहे. त्यामुळे हल्लेखोर नेमके कोण आहेत याचा शोध सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीतील आमदार फोडले. तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील ३० हून आमदार गेले आहेत. त्यात नाशिकच्या सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांचा देखील समावेश आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याची नोंद पोलीसांत झाली आहे. तर पोलीस याचा तपास करत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!