Satana | आमदार दिलीप बोरसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0
31

Satana | संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह सटाणा तालुक्यात रविवार (दि.२६) आणि सोमवार (दि.२७) रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यासह तालुक्यातील पिकांचे विशेषतः द्राक्षे, कांदे, भाजीपाला ह्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, तालुक्यातील संबंधित बाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी बागलाण तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहेत.

याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना तालुक्यातील नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देणे हे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहेत.

सटाणा तालुक्यात रविवार (दि.२६) व सोमवार (दि.२७) सलग दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टि झाली आहे. वादळी वाऱ्याबरोबरच काही भागात गारपीटही झाली.

Big News | सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने अर्ली उत्पादन घेणाऱ्या द्राक्षबागा तसेच डाळिंब व अन्य फळबागा आणि टोमॅटो व भाजीपाला तसेच लाल कांदा, उन्हाळी कांदा रोपं, गहू, हरभरा, ऊस, भात आणि काढून ठेवलेल्या मका ह्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे.

वादळी वारा, गारपीट, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांची माती झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झालेला असून, चालू वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकरी संकटात असताना आता ह्या अस्मानी संकटाची भर पडलेली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून दिलासा मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत महसूल विभागाला निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही आ. दिलीप बोरसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून, शेतकरी वर्गाला लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही सटण्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनाही तत्काळ नुकसान भरपाई मिळावी. यासाठी विमा कंपन्यांनादेखील निर्देश देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले आहे.

Nashik | बिजोरसे-नामपूर रस्त्यासाठी सव्वा कोटी मंजूर; रस्त्याचे काम सुरू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here