malegaon | दादा भूसेंविरोधात मोर्चा

0
21

malegaon |  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विरोधात त्यांच्याच मतदार संघात आज मोर्चा काढण्यात येणार आहे. मंत्री दादा भुसे हे नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. आधी ललित पाटील ड्रग्स प्रकरणात तर आता  हीरे कुटुंबीय फसवणूक प्रकरणात त्यांचे नाव रोवण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून राजकीय आकस आणि द्वेष किंवा सूडाच्या भावनेतून हीरे कुटुंबीयांना टार्गेट करण्यासाठी खोते गुन्हे दाखल केले जात असल्याचे घणाघाती आरोप हीरे समर्थकांकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यंचा निषेध करण्यासाठी आज (दि .६ नोव्हेंबर) रोजी “निषेध मोर्चा” काढण्यात अला आहे.

Chhagan Bhujbal | मराठा ओबीसीत फुट पाडण्याचा भुजबळांचा डाव..?

हा निषेध मोर्चा केबीएच विद्यालय ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. ह्या सुड वृत्तीने काम करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी व ह्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्वाभिमानी निषेध मोर्चास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन हीरे समर्थकांच्या वतीने पत्रकान्वये तथा इतर विविध मध्यमांवरून करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here