Maratha Reservation | अन् मराठे जिंकले; रातोरात निघाले अध्यादेश…

0
28
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  ६ दिवसांचा खडतर प्रवास करून मराठा आंदोलक हे काल लाखोंच्या संख्येने मुंबईच्या वेशीवर पोहोचले. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेत त्यांना सुद्धरित जीआर दाखवला. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, जरांगे यांनी जाहीर सभेत जीआर वाचून दाखवत त्या जीआरमध्ये बदल करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व बदल करून शिष्टमंडळाने रात्री उशिरा मनोज जरागेंची भेट घेतली आणि चर्चा केली.

तसेच यावेळी सुधारित अध्यादेश हा मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला. या सुधारित अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंनी केलेय अन्य मागण्याही मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातून ज्यूस पिऊन थोड्या वेळातच उपोषण मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Maratha Reservation)

Manoj Jarange Mumbai | मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य

समाजाचा आता एकनाथ शिंदेंना विरोध नाही

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की,”एक समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांना विरोध नाही. आज सकाळी ८ वाजता वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री स्वतः पत्र घेऊन येणार आहेत. तसेच, मी सर्वांना विचारूनच याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलेलं आहे. आज आम्ही याठिकाणी जाहीर सभा घेणार असून, मुंबईत जाणार नसल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी घोषित केलं. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगितलं.

काल रात्री उशीरा शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्द केला. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याचं घोषित केलं. तसेच, सर्व मागण्यांचे अध्यादेशही आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं. तसेच त्यांच्या कुटुंबांसुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं. ही प्रमुख मागणी मान्य झाली असून, सरकारने सगेसोयऱ्यांबद्दल अध्यादेशही काढले आहेत. सुधारित अध्यादेश मला दिल्याचंही मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. तसेच आंतरवली सराटीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. (Maratha Reservation)

Maratha Morcha | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आजच तोडगा निघणार..?

वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती

“वंशावळीसाठीही प्रत्येक तालुका पातळीवर एक समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी नोंदी  सापडल्या असून, शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर विशेष कायदाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं आरक्षणचं काम केलं आहे.”, या शब्दात जरांगेंनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. (Maratha Reservation)

Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या लढ्याला यश

यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. मनोज जरांगेंनी ही खूप मोठी लढाई मराठा समाजासाठी लढली, आणि त्यांच्या या लढ्याला यशही आलं. त्यांना विनंती करण्यात आली की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं. मात्र ते म्हणाले की, ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत केली. त्यांनी समाजाला भेटण्यासाठी आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः येथे यावं. दरम्यान, आता त्यानुसार सकाळी ८ वाजता स्वतः मुख्यमंत्री हे मनोज जरांगेंचं उपोषण सोडणार आहेत.”


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here