Maratha Reservation | फडणवीस, पवारांच्या निवासस्थानी धडकणार मराठा आंदोलक 

0
35
Maratha Reservation
Maratha Reservation

मुंबई:   राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न चांगलाच तापला आहे. उपोषणानंतर मनोज जरांगे हे आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून, त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, आज मराठा आंदोलक हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले. मात्र, सरसकट ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे आणि मराठा समाजातर्फे केली जात आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation | जरांगे 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट करणार

तर, या मागणीला ओबीसी समाजाने कडकडून विरोध दर्शविला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 29 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली असून, तोपर्यंत तोडगा न निघाल्यास 29 ऑगस्टला पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचा वेळकाढूपणा; निंबाजी आहेर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काल राज ठाकरेंसोबत ऑन कॅमेरा चर्चा 

यातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी आंदोलन केले जात आहे. शरद पवार संभाजीनगर दौऱ्यावर असताना ते राहत असलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मातोश्रीबाहेरही मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. तर, काल राज ठाकरेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांसमोर राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यात चर्चा झाली.

Maratha Reservation | भुजबळांचं टेन्शन वाढलं; मनोज जरांगेंचे पुढील उपोषण येवल्यात..?

फडणवीस, पवारांच्या निवासस्थानी धडकणार मराठा आंदोलक 

दरम्यान, यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आणि त्यानंतर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलक रमेश केरे पाटील हे आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलन करणार असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.(Maratha Reservation)

… तर, ठिय्या मांडू

दरम्यान, “आम्हाला पोलिसांनी अडवलं तर आम्ही तिथे ठिय्या मांडू”, असा इशारा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी दिला आहे. तर, “शरद पवार यांनी त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली ती कशासाठी झाली..?”, याबाबत खुलासा करण्याची मगाणीही त्यांनी केली आहे.

आरक्षण प्रश्न लवकर मार्गी लावा; अन्यथा बांगलादेशमध्ये जे घडतंय ते तुम्ही बघताय

“समाजासाठी हे सर्व नेते का एकत्र येत नाहीत. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे. त्यामुळे आम्हाला शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात टिकणारे आरक्षण पाहिजे. केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सरकारने आणि इतर नेत्यांनी लवकर मार्गी लावावा. अन्यथा बांगलादेशमध्ये काय घडतंय, हे तुम्ही बघताय. त्यामुळे आमचाही उद्रेक पाहू नका”, असा इशाराही यावेळी बोलताना रमेश केरे पाटील यांनी दिला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here