Nashik News | मनोज जरांगेंची तोफ नाशकात धडाडणार

0
19

Nashik News | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित झाल्यानंतर मनोज जरांगे आणि राज्यातील सकाळ मराठा समाजाने राज्य सरकारला राज्यातील मराठा – कुणबी, तसेच कुणबी – मराठा या नोंदी शोधण्यासतही २४ डिसेंबर पर्यंतचा वेळ दिल आहे.

या दरम्यान, आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौरा करत संबंध महाराष्ट्र पिंजून कढणार आहेत. दरम्यान, आता नाशिक जिल्ह्यातही मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. यासंबंधी आता सभेची तारीख व जागाही ठरली आहे.

नाशिकमध्ये २१ नोव्हेंबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे संध्याकाळी सात वाजता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भव्य सभा पार पडणार आहे. मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही सभा होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता

तरी या सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील व आसपासच्या समस्थ गावखेड्यावरच्या ग्रामस्थांनी तसेच जिलहीटईल सकाळ मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

फक्त मराठा समजानेच नाहीतर, इतरही सर्व समजांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकाळ मराठा समाज त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातीलच नाहीतर, आसपासच्या प्रत्येक गावातील आणि घराघरातील बांधवांनी या सभेसाठी उपस्थित राहावे कारण, हा लढा कोण्या समाजाच्या विरोधात नसून फक्त मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आहे.

अशी विनंतीही सकल मराठा समाज त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Nashik news | नाशकात एकाच परिसरात ४ बिबट्यांचा मुक्तसंचार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here