Manoj Jarange mumbai rally | झोपेत पोलिसांनी सह्या घेतल्या; जरांगेंनी केले आरोप

0
35
Maratha Reservation
Maratha Reservation

Manoj Jarange mumbai rally |  ठरल्या प्रमाणे आज मनोज जरांगे पाटील आणि लाखों मराठा आंदोलक हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, आधी उच्च न्यायालयाने आणि काल मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. तरीही मनोज जरांगे हे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईच्या मार्गावर आहेत. आज सकाळच्या सुमारास ते नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले. मुंबईत येण्यापूर्वी आता आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलीस आणि मनोज जरांगे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, यातच आता मनोज जरांगे यांनी पोलिस प्रशासनावर एक आरोप केला आहे. ते म्हणाले की, “मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर माझ्या सह्या घेतल्या आहेत.(Manoj Jarange mumbai rally)

Manoj Jarange | मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली

Manoj Jarange mumbai rally | काय म्हणाले जरांगे पाटील..?

यावेळी जरांगे म्हणाले की,”पोलिसांनी मला तो कोर्टाचा आदेश असल्याचं सांगितलं. तेव्हा मी झोपेत होतो. मी कोर्टाचा सन्मान करतो आणि त्याचमुळे मी लगेच त्या इंग्रजी कागदावर सही केली. पण तो कागद हा आझाद मैदानाच्या संदर्भात होता. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली असल्याचा काहीतरी तो कागद होता. माझी फसवणूक करुन पोलिसांनी त्या कागदावर माझी सही घेतलेली आहे. पण जर त्याचा काही दुरुपयोग केला तर, गाठ माझ्याशी आहे. असा इशाराच यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.(Manoj Jarange mumbai rally)

मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पण जरांगे मात्र आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर अडून आहेत. दरम्यान, यामुळे आज सकाळपासून आझाद मैदानात मराठा आंदोलक हे पोहचण्यास सुरुवात झाली आहे. मराठा मोर्चा आणि मराठा नेते मनोज जरांगे हे आझाद मैदानात येण्यापूर्वी राज्यातील कानाकोपऱ्यांतून मराठा समाज हा आझाद मैदानात जमण्यास सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange | मनोज जरांगेंना हायकोर्टाने बजावली नोटीस

चालून चालून जरांगेंचे बूट फाटले

गेल्या २० तारखेपासून मनोज जरांगे हे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघाले आहे. कधी पायी चालत तर, कधी गाडीतून ते हा प्रवास करत आहेत. शहरात ते चालूनच प्रवास करत आहेत. दरम्यान, या प्रवासाच्या वाटेत काल त्यांचे बूट फाटल्याचे एकाच्या लक्षात आले. त्यानंतर एका नेत्याने त्यांच्यासाठी लगेच नवे बूट खरेदी केले आणि आंदोलकाच्या इच्छे खातर जरांगे यांनी ते बूट घालीनच पुढील प्रवासाला सुरुवात केली.

मुंबईकरांनी आंदोलकांसाठी घराघरातून पाठवले जेवण

नवी मुंबई येथे मनोज जरांगे आणि त्यांच्यासह आलेल्या लाखो मराठा आंदोलकांसाठी तीन हजार किलो इतका मसालेभात तयार करण्यात आला आहे. तर, मुंबईच्या घराघरातून २५ हजार चपात्या जमा करण्यात येत आहेत. मराठा क्रांती मोर्चानी आवाहन  केल्यानंतर मोठ्या संख्येने चपात्या जमा झाल्यात. घराघरातून लोक ठेचा भाकरी आणून देत आहेत.(Manoj Jarange mumbai rally)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here