Malegaon | मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन

0
33
Malegaon
Malegaon

Malegaon |  महाराष्ट्र सरकारने एनसीसी ह्या कंपनीला नाशिक तसेच जळगाव ह्या झोनमध्ये प्रीपेड मीटर बसविण्यासाठी दिलेल्या ठेक्याला विरोध करण्यासाठी तसेच मालेगाव येथे पावर सप्लाय ह्या कंपनीच्या वतीने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असून, मनमानी कारभार करणाऱ्या एम.पी.सी.एल ह्या कंपनीला तात्काळ हटवण्यात यावे.(Malegaon)

तसेच पुन्हा म .रा. विद्युत वितरण ह्या कंपनीकडेच मालेगाव शहराचा कारभार सोपावावा आणि राज्यभरात घरगुती वीज ग्राहकांना इतर राज्यांप्रमाणेच ३०० युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करण्यात यावा. त्याबरोबरच देशात सर्वाधिक विजेचा दर हा महाराष्ट्र राज्यात असून, तो अवाजवी स्वरूपातील आहे. दरम्यान, इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही विजेचे दर हे कमी करून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात हा वीज पुरवठा करण्यात यावा.

Shivsena News | सुषमा अंधारे आज आमदार कांदेंच्या बालेकिल्ल्यात गरजणार

ह्या मागण्यांसाठी सोमवार (दिनांक ११ डिसेंबर) म्हणजेच उद्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्प रोड मालेगाव येथे धरणे आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

मालेगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, व्यापारी, उद्योजक संघटना यांनीही ह्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविलेला असून, मालेगावच्या नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मालेगाव हिंदू मुस्लिम एकता संघटन’ तर्फे करण्यात आले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here