Malegaon Political | हिरे अन् काकांची खुमखुमी मतदारांनी उतरवली; मालेगावात रिक्षा पलटी, मशाल विझली…

0
47
#image_title

Malegaon Political | महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवार दादाजी भुसे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. सुरुवातीला टफ फाईट वाटत असलेल्या मालेगाव बाह्य मध्ये दादा भुसेंनी एकहाती वर्चस्व मिळवत विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्वय हिरे यांचे डिपॉझिट जप्त केले. तर रिक्षालाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Assembly Election Result | मालेगावात दादा भुसेंची मोठी आघाडी; सलग चार फेऱ्यांमध्ये आघाडीवर

दादा भुसे यांनी पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयश्री

२६ व्या फेरिअंती दादा भुसे यांना १ लाख ५७ हजार २७३ मतं मिळाली असून ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांना ३९ हजार १११ तर अपक्ष उमेदवार बंडु काका बच्छाव यांना ५२ हजार ३७२ इतकी मतं मिळाली. त्यामुळे दोन्ही विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत दादा भुसे यांनी पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयश्री खेचून आणला आहे.

Malegaon | भुसेंची लीड लाखांपेक्षा जास्त तर हिरेंचे डिपॉझिटही जप्त होणार?

रिक्षा पलटी झाली तर मशाल विझली

त्यामुळे मालेगावात रिक्षा पलटी झाली तर मशाल विझली असून भुसे यांनी बालेकिल्ला अबाधित ठेवत विजयी परंपरा कायम राखली आहे. मालेगावात महायुती शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विजयी गुलाल उधळत एकच जल्लोष सुरू केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here