मालेगाव : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने मालेगाव महानगर पालिकेच्या 65 लोकांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन आभार व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2022 मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनानंतर 1-11-2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी जे कर्मचारी यांचे सेवेत असताना मृत्यू पावले.
त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना व आरोग्याच्या कारणामुळे निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून सेवानिवृत्ती वेतन व मृत्युउपदान लागू करण्याचा आदेश केला होता. त्यानुसार मालेगाव महानगरपालिकेतील 1-11-2005 नंतर नियुक्त झालेल्या नवीन परिभाषित पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळत नसलेले 65 कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना यामुळे फायदा होणार आहे.
कृषी कायदे रद्द ; मालेगाव संघर्ष समितीचा जल्लोष
गेल्या दीड वर्षापासून सेवानिवृत्ती वेतन लागू व्हावे अशा प्रतीक्षेत असलेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी निखिल पवार हे पाठपुरावा करत होते. त्याला मनपा प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त तौसिफ शेख, आस्थापना पर्यवेक्षक निलेश जाधव, वरिष्ठ पेन्शन लिपिक अनिल कोठावदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष मेहनत घेतली.
शासन आदेशानुसार सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल मनपा प्रशासक तथा आयुक्त रवींद्र जाधव, अती आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त राजेंद्र फातले, मुख्य लेखापरीक्षक कुरेशी मॅडम, लेखा परीक्षक वैद्य, लेखा अधिकारी राजू खैरनार, हरीश डिंबर, सहाय्यक आयुक्त तौसिफ शेख, नगरसचिव साजिद शेख आस्थापना पर्यवेक्षक निलेश जाधव, वरिष्ठ पेन्शन लिपिक अनिल कोठावदे यांचे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी यांनी भेट घेऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम