Malegaon news | मालेगाव ‘मिनी पाकिस्तान’ होतंय?; पोलीस आयुक्तालयाची मागणी

0
55
Malegaon news
Malegaon news

Malegaon news | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon news) हे गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जाते. दरम्यान, या शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मालेगावमध्ये वेगळे पोलीस आयुक्तालय निर्माण करावे अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे. मालेगाव शहर तसेच बाह्य परिसरात गुन्हेगारीमुळे ह्या शहराची ओळख ही ‘दंगलीचे शहर’ म्हणून झाली आहे.

दरम्यान, यामुळे बाहेरील उद्योग हे मालेगावसह आजूबाजूच्या परिसरात येत नाही. त्यामुळे मालेगाव ह्या शहराचा  विकास करण्यासाठी तसेच ह्या शहरातील लोकसंख्याचा समतोल साधण्यासाठी नवनवीन उद्योग येथे विकसित होणे ही काळाची गरज आहे. दरम्यान, यासाठीच मालेगावमध्ये विशेष पोलीस आयुक्तालय स्थापन करणेची मागणी नितेश राणे यांनी केली असून, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र देखील त्यांनी लिहले आहे.

Parliament Winter Session | अधीर रंजन चौधरीसह विरोधी पक्षाचे 33 खासदार निलंबित

दरम्यान, नितेश राणे यांनी ह्या पत्रात म्हटले की, नाशिकमधील मालेगाव हेराज्यातील अतिशय संवेदनशील शहर असून, ते जातीय दंगलींचे केंद्र बनलेले आहे. दरम्यान, शासन दरबारी तसेच पोलीस यंत्रणेकडे सुद्धा या शहराची अशीच नोंद असल्याचे दिसते. ह्या मालेगाव शहराचा जातीय दंगलींसोबत फार जुना इतिहास असून, जगातील वेगवेगळ्या घटनांचे प्रतिसाद हे मालेगावात उमटत असतात. तसेच काही वेळी ह्या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी मालेगावात मिलिटरीला देखील बोलवावे लागले होते.(Malegaon news)

हे सर्व बघता मालेगाव परिमंडळातील पोलीसांच्या अहवालानुसार, २००१-२३ या वर्षांमधील मधील एकूण हिंदु –मुस्लिम दंगलींच्या घटनांचा आकडा हा १८८ इतका असुन, यामुळे मालेगाव मधील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मालेगाव मध्ये नवे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी आमदार राणे यांनी केली.

Vinod Tawde | काय सांगता तावडे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…?

मालेगाव होणार छोटा पाकिस्तान |(Malegaon news)

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराला ‘मिनी पाकिस्तान’ बनवण्याच्या हालचाली ह्या सुरू आहेत. ह्या शहरात असलेल्या काही अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ड्रग्स तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण देखील वाढले आहे. पण, गुन्हेगारीच्या पाहता त्या तुलनेत येथे असलेले पोलिसबळ हे अत्यंत कमी आहे.(Malegaon news)

तसेच, मालेगाव शहरामध्ये कुठलीही अघटित घटना घडल्यास पोलिसांना त्या घटना स्थळी पोहोचण्यासाठीच किमान अडीच तासांचा वेळ लागतो. दरम्यान, त्यामुळे आम्ही आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, सोबतच मालेगाव ह्या शहरात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी देखील केलेली असल्याचं नितेश राणे यांनी सांगिले आहे. (Malegaon news)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here