Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी

0
11
Malegaon News
Malegaon News

Malegaon News | सोमनाथ जगताप – मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि परिसर सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून समितीच्या माध्यमातून शिवप्रेमी करत आहेत परंतु आजतागायत सुशोभीकरण झाले नसून त्या विरोधात समितीच्या वतीने शिवतीर्थ येथे आज दुसऱ्यांदा आंदोलन करण्यात आले.

Pune News | काय सांगता..! ६१ लाखांची मटणाची उधारी
मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ तसेच दि. ११ एप्रिल २०२३ रोजी शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. मात्र आज पर्यंत सदर काम सुरू झाले नाही त्यामुळे शिवप्रेमी मध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तसेच मालेगावातील शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवतीर्थावर लाक्षणिक उपोषण करून शिवतीर्थ सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मनपा प्रशासनाने आश्वासन दिले होते की तात्काळ काम चालू केले जाईल परंतु आजपर्यंत मनपा प्रशासनाने शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम चालू केले नाही. याचाच तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशी भूमिका आंदोलक वक्त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली. (Malegaon News)

Malegaon News | नेमकं प्रकरण काय?

दोन वेळा भूमिपूजन करून देखील सुशोभीकरणाचे काम सुरू झाले नाही त्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी निखिल पवार यांनी यावेळी केली. शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात यावा त्यावर शिवप्रेमी संघटनांची संमती घेण्यात यावी. शिवतीर्थ परिसरातील सर्व विद्युत तारांचे अंडरग्राउंडकरण करण्यात यावे. या संपूर्ण परिसरात कोणताही बॅनर लावण्यात येऊ नये यासाठी संपूर्ण परिसर न बॅनर झोन म्हणून घोषित करावा. संपूर्ण परिसराचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. शिवतीर्थ परिसराला आकर्षक रोषनाई करण्यात येऊन इतिहासाला साजेसं शिवतीर्थ सुशोभीकरण करावे अशी मागणी आजच्या धरणे आंदोलन प्रसंगी करण्यात आली.

Deola | खामखेडा गावावर तिसऱ्या डोळ्याची नजर ; १६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
यावेळी आंदोलन स्थळी भेट देऊन मनपा प्रशासनातर्फे उपयुक्त राजेंद्र फातले, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी २६ जानेवारी पर्यंत काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. शिवजयंती उत्सव समिती, सर्वजनिक नागरिक सुविधा समिती, मध्यवर्ती गणेश उत्सव समिती, वंचित बहुजन आघाडी, बारा बलुतेदार मित्र मंडळ, महात्मा फुले बहुजन आघाडी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लोकशाही धडक मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय समता परिषद आदी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

निखिल पवार, देवा पाटील, रामदास बोरसे, विवेक वारुळे, भरत पाटील, कैलास शर्मा, जितेंद्र देसले, गुलाब पगारे, कैलास तिसगे, शेखर पगार, निलेश जगताप, भारत म्हसदे, दिनेश पाटील, क्रांती पाटील, दिपक पाटील, सुशांत कुलकर्णी, जगदीश खैरनार, धर्मा अण्णा भामरे, संभाजी बच्छाव, योगेश पाटील, प्रशांत जाधव, तुषार पाटील, भैय्या हिरे, राजेश सूर्यवंशी, विजय जाधव, नंदकुमार सावंत, दिपक पवार, संदीप मोरे, अक्षय पवार, नारायण राजपूत, दादाजी हिरे, रमेश उचित, संजय साबळे, राम गवळी, कपिल डांगचे, हरीश ठाकूर, अमन परदेशी, यु. आर. पाटील, श्रावण वेताळ, काशिनाथ सोनवणे, समाधान कदम, डॉ. संतोष पाटील, सुनील सोनवणे, विजय पवार, यावर अली, हरीश मोरे, दिनेश ठाकरे, रामदास बच्छाव, चेतन ढीवरे, राजेंद्र पाटील, प्रमोद गांगुर्डे, चेतेश आसेरी, तुषार छाजेड,, दिपक कदम, सागर पवार, अमोल निकम, भाग्येश वैद्य, उमेश ब्राम्हणकर. समीर सोनवणे, संदीप आभोनकर, चैतन्य देवरे, हरिदादा निकम, करण भोसले, जगदीश साबळे, भूषण बच्छाव, सिद्धार्थ आहिरे, राजेंद्र पवार, विनोद जगताप व मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here