Malegaon | मालेगाव मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर नागरी सुविधा समितीचे धरणे आंदोलन स्थगित

0
21
Malegaon
Malegaon

मालेगाव : येथील सरदार चौकात सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे रामदास बोरसे यांच्या नेतृत्वात पाणीपट्टी मधील दरवर्षी 5% होणारी वाढ रद्द करावी व इतर मागण्यांसाठी आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मनपा आयुक्तांच्या आश्वासनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Malegaon | मागण्या काय..?

सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे १) सोमवार वार्ड सि.स.नं.१४९ ही जागा ‘बगिचा’ कारणासाठी आरक्षित असलेने सदर जागेचे मनपाने भूसंपादन करुन बगिचा उभारावा २) मालेगांव शहरात अनेक वर्षांपासून वाढविलेले ५% पाणीपट्टी रद्द करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रस्ताव पाठविलेला असून परंतु अद्यापपावेतो वाढीव ५% पाणीपट्टी रद्द झालेली नाही. तरी वाढीव पाणीपट्टी रद्द करुनच पाणीपट्टीचे बिल वाटप करावे ३) शहरात जागोजागी पार्किंग व्यवस्था करावी ४) इस्लामाबादकडे जाणारी लिकेज पाण्याची पाईप लाईन दुरुस्त करणेकामी रु.२.८० कोटी मंजूर असतानाही पाईप लाईन बदलली जात नाही. तरी तात्काळ पाईपलाईनचे काम सुरू व्हावे ५) गुळ बाजार, सरदार मार्केट ते उर्दू लायब्ररीपावेतो रस्ता काँक्रीटीकरण करावा ६) संपूर्ण शहरात नियमीतरुपाने साफसफाई व्हावी ७) सांडव्या पुलाचे उर्वरीत काम मनपाने पूर्ण करुन तो कार्यान्वित रहदारीसाठी खुला करावा आशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

Malegaon | मंत्री दादा भूसेंच्या प्रयत्नातून काटवण भाग ‘सुजलाम सुफलाम’

यावेळी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी आश्वासन दिले की, पाणीपट्टी दर वाढी बाबत शासनाला प्रस्ताव पाठवला असून त्यावर पाठपुरावा करत आहोत. सांडवा पूल दहा दिवसाच्या आत काम पूर्ण करून रहदारीसाठी खुला केला जाईल. शहरात नियमित स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल व आरक्षित जागेचा भूसंपादन प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. तसेच शासकीय जागांवर पार्किंग झोन विकसित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे आलेल्या तक्रारींचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर लावून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा आयुक्त म्हणून मी प्रयत्न करत आहे, असे लेखी पत्र देऊन धरणे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.

यावेळी निखिल पवार व भरत पाटील यांनी शिवतीर्थ सुशोभीकरण कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असून तीन वेळा भूमिपूजन होऊन देखील व मनपाने तात्काळ काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊन देखील आजपर्यंत कामात सुरुवात झाली नाही. त्यामुळे ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे व नवीन ठेकेदाराला सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली.

Malegaon | अन्यथा मतं मागायला येणार नाही; भामरेंना ‘त्या’ घोषणांचा विसर..?

यावर आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर शिवतीर्थ शुशोभीकरण तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकात्मता चौकातील स्मारक याबाबत संबंधित ठेकेदाला काम तात्काळ सुरू करण्याबाबत व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत अंतिम नोटीस दिलेली आहे. जर काम लवकर सुरू नाही झाले तर ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याचे काम कारवाई केली जाईल व काम जलद गतीने पूर्ण केले जाईल असे तोंडी आश्वासन दिले.

यावेळी आंदोलनात रामदास बोरसे, निखिल पवार, भरत पाटील, अभिषेक भावसार, लाला परदेशी,अनिल गुप्ता, क्रांति पाटील, सौ अश्विनी अंधारे, पारस आम्रपाल, पवन पाटील, नेविल कुमार तिवारी, कुमार तिवारी, शाम, देवरे, भालचंद्र खौरणार, नरेंद्र साकला, फारूक भाई, कलीम भाई, वाईद भाई, महेमुद भाई, अख्तर भाई, निलेश पाटील, हर्षल गुप्ता, चेतेश असेरी,चेतन साकला, तुषार छाजेड , बाळा खौरणार, बंटी परदेशी, अमृत गुरव, विकि पाटील, किरण पाटील, दत्तु गवळी आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here