Malegaon | हैदराबाद संस्थान हे आर्थिक डबघाईला आले असता तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते. तेव्हा वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली होती. त्यांनी हैदराबादच्या वीणकरांना चरखा, सुत, अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्याच जागेस आज मालेगाव म्हणुन ओळखलं जातं.
Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?
मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मालेगाव महानगरपालिकेचे काही महत्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज रस्त्यावर पडलेली आढळून आलेली आहेत. बुनकर बाजार रोडवर महानगरपालिकेची काही महत्वाची कागदपत्रे ३ गोण्यामध्ये भरून रस्त्यावर टाकलेली आढळली असता मालेगावमधील काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत चौकशी केली असून मालेगाव महानगरपालिका प्रशासनाला याबाबत कळवण्यात आलं आहे.
‘Nashik Transport Association’ च्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात घेतली मंत्र्यांची भेट
Malegaon | हा सर्व प्रकार नेमका का घडला असावा?
महानगरपालिकेची कागदपत्रे अशाप्रकारे रस्त्यावर गोण्यांमध्ये भरून टाकणे कितपत योग्य आहे? तसेच हा घडलेला प्रकार कुठेतरी मालेगावमधील महानगरपालिकेचा भ्रष्ट्राचार लपवण्याचा प्रकार आहे असा सूर आता मालेगावकरांमधून ऐकू येत आहे. हे प्रकरण नेमकं घडल कसं? ह्या पालिकेच्या फाईल्स नेमक्या कशा संदर्भातील आहेत? या कागदपत्रांना नेमकं रस्त्यावर टाकण्यामागे कारण काय ? असे सवाल आता उपस्थित होत आहे. महानगरपालिकेतील ज्या ज्या विभागाच्या या फाईल्स आहेत त्या संबंधित विभागाच्या मुख्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मालेगावकरांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास मालेगाव पोलिस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम