Maharashtra Elections | विधानपरिषदेतच महायुतीत फुट..?; मनसे विरुद्ध भाजप लढतीची घोषणा

0
147
Maharashtra Elections
Maharashtra Elections

Maharashtra Elections |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून, लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वतः राज ठाकरे आणि मनसे (Manse) कार्यकर्तेदेखील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले. मात्र, अता राज्याच्या राजकारणात हे काहीतरी वेगळच चित्र निर्माण झाल्याचे दिसत असून, विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदार संघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली होती. या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व असून, येथे भाजपचे निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. (Maharashtra Elections)

Maharashtra Elections | ‘हे’ आहेत भाजपचे उमेदवार 

दरम्यान, आता भाजपने आपले विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election) उमेदवारांची नावं जाहिर केली आहे. या ४ जागांपैकी तीन जागा भाजप लढवणार असून, यात मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ, कोकण पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. या तिन्ही जागेंवर भाजपकडून उमेदवार जाहीर झाले असून, कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर, मुंबई पदवीधर मतदार संघातून किरण शेलार, मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Manoj Jarange | विधानसभा निवडणूक लढवणार..?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा..!

उमेदवार मनसेचा की महायुतीचा..?

मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजीत पानसेंना उमेदवारी देण्यात आली असून, आता या मतदार संघात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होणार आहे. मनसेने उमेदवार जाहीर केल्यापासूनच उमेदवार मनसेचा की महायुतीचा..? याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, आता अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजपनेही माघार न घेता आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.

Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here