Maharashtra News ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासुन एका महिलेचा तक्रारीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.या व्हिडीओमध्ये म्हटल्या प्रमाणे मराठी भाषिक असल्याने एका व्यक्तीने आणि त्याच्या मुलाने इमारतीतील जागा भाड्याने देण्यास नकार दिल्याची तक्रार एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.इमारतींमधील जागा भाड्याने देण्याबाबत राज्य सरकार नियमावली तयार करेल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिली.मराठी भाषिक असल्याने एका व्यक्तीने आणि त्याच्या मुलाने इमारतीतील जागा भाड्याने देण्यास नकार दिल्याची तक्रार एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.(Maharashtra News )
Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!अनेक मार्गांवर स्पेशल ट्रेन
मुलुंडच्या पूर्व उपनगरातील शिवसदन इमारतीत महिलेला कार्यालयाची जागा नाकारल्याप्रकरणी ८० वर्षीय वृद्ध आणि त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१ (चुकीच्या पद्धतीने अडवणे), ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) आणि ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर सोडण्यात आले.महाराष्ट्रातील मंत्र्यांनी शनिवारी तक्रारदार महिलेची तिच्या निवासस्थानी भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.
Rain Update | राज्यातील पावसाची आताची काय स्थिती?
पत्रकारांशी बोलताना नेत्या अदिती तटकरे म्हणाल्या की, कोणी मराठी भाषिक आहे म्हणून त्याला जागा नाकारणे दुर्दैवी आणि निंदनीय आहे.पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून जागा भाड्याने देण्याबाबत नियमावली तयार करण्यात येईल, असे नेत्या अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम