Maharashtra MLC Election | शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका स्थगित; कधी होणार निवडणूक..?

0
27
Vidhanparishad
Vidhanparishad

Maharashtra MLC Election | निवडणूक आयोगाने येत्या १० जून रोजी विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. तर, १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. नाशिक व मुंबई शिक्षक तसेच मुंबई व कोकण पदवीधर या चार मतदारसंघांसाठी या निवडणुका होणार होत्या. काही पक्षांकडून तर उमेदवारांच्या नावाची चर्चाहि सुरू झाली होती, असे असताना यातच आता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शिक्षक संघटनांच्या रेट्यापुढे केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित केल्या असून, आयोगाने मंगळवारी (दि. १४) रोजी यासंदर्भातील पत्रक काढले आहे. शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार शालेय सुट्ट्यांनंतर आता या निवडणूकांचा कार्यक्रम नव्याने घोषित होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra MLC Election)

Teachers and Graduates Election | विधानपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

गेल्या आठवड्यातच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांचा निकाल लागताच १० जून रोजी नाशिकसह राज्यातील दोन शिक्षक तसेच दोन पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. तर, बुधवारपासून (दि.१५ मे) पासून या चारही मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होणार होती.

Maharashtra MLC Election | यामुळे निवडणूक स्थगित 

तर, १० जूनला मतदान आणि १३ जूनला मतमोजणी होणार होती. परंतु, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकांची धामधूम आणि शाळांच्या सुरु असलेल्या उन्हाळी सुट्यांचा परिणाम देखील या निवडणूकीवर होण्याची भिती असल्याने आणि सलगच्या निवडणूकांमुळे राज्यातील शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra MLC Election)

Vidhanparishad Election | ठाकरे गटाकडून ‘हे’ उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here