Maharashtra Goverment | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यात महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर घोषणा आणि योजनांचा पाऊस पाडला. महिला आणि युवावर्गासाठी यात विशेषतः महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील या शेवटच्या अधिवेशनातील या आहेत टॉप १० घोषणा…
१. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये
आजच्या या अर्थसंकल्पात अजित पवारांनी वारकऱ्यांसाठी “मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ” स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच, वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये निधी दिला जाणार आहे. तसेच, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचेही यावीळ अजित पवार यांनी सांगितले. (Maharashtra Goverment)
२. महिलांना १५०० रुपये
अजित पवारांनी आजच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून, या अंतर्गत राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे. (Budget Session)
३. वर्षाला ३ सिलेंडर मोफत
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेच्या अंतर्गत ५२ लाख कुटुंबांना वर्षाला ३ सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
४. शेतकऱ्यांना वीज बिल माफ, आर्थिक मदत
- शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा
- राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
- ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली जाणार
- गाव तिथे गोदाम योजना राबवली जाणार
- राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर ५ हजार रुपये अनुदान
- राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ केले जाणार
- गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ जुलैपासून प्रति लिटर ५ रुपये अनुदान
Budget Session | ‘हे’ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण; काय आहे योजना..?
Maharashtra Goverment | ५. मुलींना शिक्षण मोफत
व्यावसायिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या ८ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. (Maharashtra Goverment)
६. शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ
राज्यातील विवाहित मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या शुभमंगल या योजनेचा निधी हा आतापर्यंत १० हजार होता. यात वाढ करण्यात आली असून, आता हा निधी १० हजारांवरून २० हजार रुपये इतका करण्यात आला आहे. (Budget Session)
७. महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा
राज्य सरकार महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा आणि नवीन रुग्णवाहिका देखील खरेदी करणार असल्याची घोषणा अजित अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली.
८. २५ लाख लखपती दिदी
यावर्षी २५ लाख महिलांना सरकार लखपती दिदी बनवणार असल्याचा शासनाचा विचार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत
९. शासकीय महाविद्यालये स्थापन करणार
राज्यात २०३५ पर्यंत १ लाख लोकसंख्येमागे १०० हून अधिक डॉक्टर्स बनवण्याचा राज्य सरकारचा मानस असून, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेली नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व ४३० खाटांची संख्या असणारी रुग्णालये स्थापन केली जाणार आहे. त्या अंतर्गत जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे या प्रकारची रुग्णालये उभारली जातील.
१०. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या योजनेनंतर्गत दरवर्षी १० लाख तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना दरवर्षी १० हजार रुपये इतका स्टायफंडही दिला जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम