Loksabha | गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा पार पडला. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ‘राममंदिर निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा’ या विषयावरील आभाराच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असता, यावेळी लोकसभेत “बाबरी मशिद होती, आहे आणि राहील, बाबरी मशिद जिंदाबाद, भारत जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या.
यानंतर काही काळ लोकसभेत तणावाचे वातावरण होते. तर, लोकसभेत अशा घोषणा दिल्याच्या या घटनेमुळे सर्व स्तरावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, यावर गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणाबाजीवर उत्तर दिले. ते म्हणाले की, “२२ जानेवारी हा तब्बल १० हजार वर्षांचा ऐतिहासिक दिवस असून, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जे इतिहास ओळखत नाही ते त्यांचे अस्तित्व गमावून बसतात.’ असा टोला त्यांनी यावेळी घोषणाबाजी करणाऱ्यांना लगावला.(Loksabha)
Magh Gupt Navratri | आजपासून सुरू होणाऱ्या ‘गुप्त नवरात्री’त वर्ज्य करा या गोष्टी
Loksabha | काय म्हणाले ओवेसी..?
लोकसभेत राम मंदिर निर्माणाच्या आभाराच्या चर्चेदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ही घोषणाबाजी केली. तसेच यावेळी ओवेसी यांनी पीव्ही नरसिंह राव व लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “६ डिसेंबर रोजी जेव्हा बाबरी मशीद शहीद झाली. त्यावेळी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव हे पूजा करत होते. त्यावेळी ते म्हणाले होते की,”मला त्रास देऊ नका, मी पूजा करतोय”. बाबरी मस्जिद शहीद झाली. तेव्हा जे व्यक्ती पूजा करत होते आणि ज्या व्यक्तीने मस्जिद पाडण्यासाठी रथयात्रा काढली. त्यांना केंद्र सरकारने भारताच्या सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले आहे. यावरून न्याय जिवंत आहे की अत्याचार कायम आहे हेच समजते, अशी टीका ओवेसी यांनी केली होती.(Loksabha)
Chhagan Bhujbal | विणकरांसाठी मंत्री छगन भुजबळ मैदानात; केली ही मागणी
बाबरी मशीद आहे आणि कायम राहील…
तसेच ते म्हणाले की, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर आहेच. मात्र, नथुराम गोडसे याचा आम्ही द्वेष करतो. याचे कारण की, त्याने एका अशा व्यक्तीला गोळ्या घातल्या होत्या ज्याच्या तोंडातून ‘हे राम’ असे शेवटचे शब्द निघाले होते. पंतप्रधान मोदी याचे उत्तर देतील तेव्हा ते १४० कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतील की, ते हिंदुत्वाचे नेते म्हणून बोलतील. अयोध्येमध्ये बाबरी मशीद होती, ती आहे आणि कायम राहील. बाबरी मशीद चिरंजीवी आहे. बाबरी मशीद जिंदाबाद” अशा घोषणा ओवेसी यांनी यावेळी भाषणादरम्यान दिल्या.(Loksabha)
न्यायाचा लढा येथे संपला
खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भाषणाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,”२२ जानेवारी हा दिवस १५२८ मध्ये सुरू झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध असलेल्या संघर्ष आणि चळवळीचा शेवट आहे. हा न्यायाचा लढा येथे संपला. त्यामुळे जे इतिहास ओळखत नाही. ते स्वतःचे अस्तित्व गमावतात, असे अमित शाह म्हणाले. दरम्यान, अमित शहा यांचे भाषण सुरु असतानाच खासदार ओवेसी हे सभागृहातून थेट निघून गेले. तानंतर लोकसभेत राम मंदिरावरील आभाराच्या प्रस्तावावर चर्चेसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तब्बल एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.(Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम