Loksabha Election | गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून चढाओढ सुरू होती. दरम्यान, काल अखेर या जागेचा तिढा सुटला असून, सर्व इच्छुक उमेदवारांचे रूसवे फुगवे दूर करत. हेमंत गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. यानंतर आज महायुतीच्या हेमंत गोडसे आणि भारती पवार या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Loksabha Election)
आज सकाळी घाटनदेवी ते नाशिक शहराकडे हेमंत गोडसे यांच्या वाहनांची ‘महाविजय रॅली’ झाली. या रॅलीलाही मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि गोडसे समर्थक उपस्थित होते. यानंतर बी.डी. भालेकर मैदान ते जिलधिकारी कार्यालय यादरम्यान महायुतीकडून रोड शो करण्यात आला. आज महायुतीकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले असून, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते अनाई पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Loksabha Election)
Nashik Loksabha | नाशिकच्या उमेदवारीसाठी केदा आहेरांचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज..!
दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा नाशिककरांचा निर्धार
नाशिक लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभेच्या भाजप उमेदवार डॉ. भारती पवार महायुतीचे हे दोन्ही उमेदवार याठिकाणाहून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आज याठिकाणी महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे भर उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. यावरून कळते की, नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदार संघांत आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार नाशिककरांनी केला आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. (Loksabha Election)
Loksabha Election | शिवसेनेकडून ‘या’ बहुप्रतीक्षित जागांवरील उमेदवार जाहीर
Loksabha Election | पूर्ण ताकद लावून गोडसेंना निवडून आणणारच
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत वाद सुरू असल्याने महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता. तर, दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाशिक लोकसभा मतदार संघामधून हेमंत गोडसेंना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, हेमंत गोडसे हे नक्कीच नाशिकमधून निवडून येतील. (Loksabha Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम