Lohner: लोहणेरच्या सरपंचांसह दहा सदस्य अपात्र

0
23

Lohner : लोहोणेर, ता. देवळा, येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सह इतर दहा सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर न भरल्याने अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. या अपात्र आदेशाने लोहोणेर सह सम्पूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे . (Lohner)

अपात्र घोषित करण्यात आलेल्यामध्ये विद्यमान सरपंच, सतीश सोमवंशी ,माजी सरपंच रतिलाल परदेशी , विद्यमान उपसरपंच, श्रीमती विजया मेतकर ,. विद्यमान ग्रा.पं. सदस्य . दिलीप भालेराव, दिपक बच्छाव , पुनम पवार , सौ. उषाबाई सोनवणे  भाउसिंग गायकवाड,  धोंडु आहिरे ,  सविता शेवाळे, रेश्मा महाजन यांचा समावेश आहे . (Lohner news)

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जदार समाधान महाजन यांनी प्रतिवादी क्र. १ ते ११ हे सदस्य असलेल्या लोहोणेर ग्रामपंचायतीची थकित कराची रक्कम विहीत मुदतीत भरणा केली नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तुत विवाद अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी, यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार दाखल विवाद अजावर निर्णय घेण्याचे अधिकार अपर जिल्हाधिकारी, मालेगांव यांना दिले होते .

प्रस्तुत अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जदार व प्रतिवादी यांना नोटीसा काढून सुनावणीची संधी देण्यात आली. रोजनाम्यात नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुत प्रकरणात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली आहे. अर्जदारांनी दिनांक २०/०७/२०२३ रोजीचे सुनावणीवेळी तोंडी युक्तीवाद केला आहे. प्रतिवादी क्र. १ ते ३ व ५ ते ११ यांचे माहितगार वकिलांनी दि. ०६/०७/२०२३ रोजी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. प्रतिवादी क्र. ४ यांना वाजवी संधी देण्यात येऊनही त्यांनी त्यांचा लेखी किंवा तोंडी युक्तीवाद दाखल केलेला नाही. ग्रामसेवक, ग्रामपंचायत, लोहणेर, ता. देवळा यांनी दि.०६/०४/२०२३ रोजीच्या सुनावणीवेळी त्यांचा अहवाल दाखल केला आहे.

वादी यांचा विवाद अर्ज व युक्तीवाद, प्रतिवादी यांचा युक्तीवाद व प्रकरणात दाखल कागदपत्रे यांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येत आहे. प्रस्तुत प्रकरणी अर्जदार समाधान महाजन, रा. लोहोणेर यांनी  वरील सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत कर भरणा न केल्याने त्यांचे सदस्य पद  अपात्र होणेकामी मुंबई ग्रापमपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (ह) अन्वये अर्ज दाखल केला. लोहोणेर  येथील ग्रामपंचायतीत १७ विद्यमान सदस्य आहेत. त्यापैकि वरील अकरा  सदस्यांनी सन २०२१-२२ या वर्षांचा ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत भरलेला नाही.

दि. ०३.०८.२०२१ पावेतो कर  भरणे बंधनकारक होते. तसेच विद्यमान सर्व सदस्यांना कर भरणा करणेबाबत ग्रामपंचायतीची मासिक सभा दि. २८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात  येऊन तसा ठराव  पारित करण्यात आला होता.

यातील विद्यमान सरपंच,सतिष सोमवंशी, माजी सरपंच रतिलाल परदेशी , विद्यमान उपसरपंच, श्रीमती विजया मेतकर ,. विद्यमान ग्रा.पं. सदस्य . दिलीप भालेराव, दिपक बच्छाव , पुनम पवार , सौ. उषाबाई सोनवणे  भाउसिंग गायकवाड,  धोंडु आहिरे ,  सविता शेवाळे,   ,रेश्मा महाजन यांनी त्यांच्या  युक्तीवादात, अर्जदार  यांना ग्रामपंचायतीमार्फत कर बाकी नोटीस देण्यात आल्याबाबत काही पुरावा नाही, त्यावर दिलेल्या सह्या नेमक्या कोणाच्या आहेत, याबाबत साशंकता आहे, त्यावर कोणतीही तारीख नमुद नाही, कोणाच्या समक्ष दिल्या हे नमुद नाही, या बाबी देखील नमुद केल्या आहेत. सदर कर मागणी बिलांच्या अनुषंगाने प्रतिवादी क्र. १ ते १० यांनी कराचा भरणा देखील केला आहे.

प्रतिवादींना कर मागणी बिले मिळाली नाहीत अथवा उशिरा मिळाली, असा त्यांचा दावा असल्यास त्याबाबत त्यांनी सबळ पुरावे दाखल करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी त्यांच्या दाव्याप्रित्यर्थ कुठलेही पुरावे दाखल केलेले नाहीत.

वरील सदस्यांनी  तीन महिन्यांच्या आत ग्रामपंचायत कर भरण्यात कसुर केल्याची बाब सिध्द होत असल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४ (ह) नुसार अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे  यांनी वरील अकरा सदस्यांना अपात्र घोषित केले आहे .

मौजे लोहणेर,  येथील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. २७/२०२२ मान्य करण्यात येत आहे. प्रतिवादी क्र. १ ते ११ यांना ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येत आहे, प्रतिवादी क्र. १ ते ११ यांना सदर आदेशाविरुद्ध मा. अपर आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडे १५ दिवसांच्या मुदतीत अपील दाखल करता येईल.

Breaking News | नाशिकमध्ये अजित पवारांचा ताफा अडवला

आम्हीं सरपंच व इतर दहा सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा केलेला असून, कुठल्याही प्रकारची आमच्याकडे थकबाकी नाही . अर्जदाराने आकसापोटी केलेला अर्ज व अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात सोमवारी दि ९ रोजी अपर आयुक्त नाशिक यांचेकडे आम्हीं अपील दाखल करणार आहोत .

सतीश सोमवंशी , सरपंच ,लोहोणेर ग्रामपंचायत ,ता देवळा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here