Breaking Landslide in nashik – इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा वरील काही भाग कोसळला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. इगतपुरीचे तहसीलदार घटना स्थळावर पोहचले आहेत, किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणा-या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात असलेल्या इर्शाळगड परिसरात असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात जवळपास २० जणांचा मृत्यू झाला असून ५०हुन अधिक लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान ही घटना घडताच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी नाशिक मधील कावनाई किल्ल्याचा काही भाग अचानकपणे कोसल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
दरम्यान या घटनेबाबत नाशिक पालकमंत्री दादा भुसे म्हणाले कावनाई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
विर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
Political breaking : एकनाथ खडसे यांच्या जावयाला दोन वर्षांनंतर जामीन मंजूर
काय म्हणाले पालकमंत्री
कावणाई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. विटूर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा–
दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम