Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; ‘या’ तारखेपासून 2,100 रु. खात्यात जमा होणार!

0
67
#image_title

Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यातच राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले व राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरपर्यंत अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहिते पूर्वी उपलब्ध करून दिला. तसेच निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याची ग्वाही देखील दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला निवडणुकीत झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बँकेकडून महिलांची पिळवणूक

लाडक्या बहिणींची महायुतीला पसंती

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेल्या महाविकास आघाडीने देखील प्रचारात लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता. परंतु ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलैपासून दरमहा 1,500 रुपये दिले. बहिणींनी त्याच सरकारवर विश्वास दाखवला. त्याचवेळी महायुत सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.

Ladki Bahin Yojna | सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे; अदिती तटकरेंनी दिली माहिती

राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळणार असून दरमहा 1,500 रुपये द्यायचे की, 2,100 रुपये द्यायचे याचा निर्णय पुढील काही दिवसात होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here