नाशिकमध्ये कृषीथॉन लवकरच! कर्तबगारांचा पुरस्काराने होणार सन्मान

0
35

Nashik Krishithon | आजची युवा पिढी आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी जगताला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणींत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाचा पहिला बळी चांदवड तालुक्यात..

या कृषीथॉनमध्ये ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक, युवा कृषी उद्योजक, कृषीविस्तार कार्य, युवा शेतकरी पुरस्कार’ (पुरुष गट) अशा चार गटांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती Human Service Foundation चे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी दिली. नाशिक ठक्कर्स मैदान येथे २३  ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या १६ व्या ‘कृषीथॉन’ प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here