खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना युवा शेतकऱ्याचा मृत्यु

0
29

देवळा : तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा शनिवारी दि २२ रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच दुर्दैवी अंत झाला .या युवा शेतकऱ्याचा महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता.

खामखेडा ता देवळा येथे शेवाळे वस्तीनजीक पलटी झालेला ट्रॅक्टर (छाया – सोमनाथ जगताप) व सोबत मृत राकेश धोंडगे

या अकस्मात मृत्यूने गाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,
शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा ता देवळा येथे घडली आहे. राकेश दिनेश धोंडगे अशी मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून, महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता .या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत

मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी दि.२२ रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात तो दबला गेला.या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.अवघ्या महिन्याभरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता. पण या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने संसार उध्वस्त झाला आहे.
रावसाहेब नावाचा दिलदार माणुस ! काळाच्या पडद्याआड
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला .असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे आदी करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here