केदा आहेरांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

0
38

देवळा ; भापचे नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे . दि २७ रोजी आहेर यांच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले असतांना तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पिके करपू लागली आहेत, विहिरींनीहि तळ गाठल्याने पिकांना पाणी देण्या इतपतही पाणी नाही.

यामुळे पाण्याची भीषण टंचाई शेतकऱ्यांना सतावत आहे.तालुक्यात दुबार पेरणीचे संकट दिसू लागले आहे,एकुणच तालुक्यातील चिंताग्रस्त शेतकरी व दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे दि.२७ रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.वाढदिवसा निमित्ताने होर्डिंग ,हार-गुच्छ,तसेच कोणतेही अभिष्टचिंतन सोहळ्याचे कार्यक्रम करू नयेत असे आवाहन शेवटी केदा आहेर यांनी केले आहे.दरम्यान केदा आहेर यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असला तरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here