Keda Aaher | केदा आहेरांची देवळ्याच्या जनतेला भावनिक साद; कार्यकर्ता संवाद मेळाव्यास जनतेचा उदंड प्रतिसाद

0
64
#image_title

Keda Aaher | विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर 20 ऑक्टोबर 2024 रोजी भाजपने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच नाशिकचा देवळा-चांदवड मतदारसंघात राजकीय भूकंपाला सुरुंग लागला. अन् देवळा-चांदवड मतदारसंघात भाजपात दोन गट पडले. गेली दोन टर्म उमेदवारी मिळवत आमदार पदावर असलेले डॉ. राहुल आहेर यांनी उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वी देवळा चांदवड-मतदार संघातून माघार घेत असल्याचे घोषित केले. परंतु त्यानंतर पक्षाकडून आलेल्या यादीत या मतदारसंघात त्यांचेच नाव जाहीर झाले. यावरून आता दोन भावांमध्ये वादाची ठिणगी पेटली असून त्यानंतर, केदा नाना आहेरांच्या समर्थकांकडून ‘भावानेच भावाचा गळा कापला” असे म्हणत राहुल आहेरांवर टीका करण्यात आली. तर भाजपच्या नगरसेवकांकडून यावर निषेध म्हणून राजीनामे देण्यात आले. त्यानंतर आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी केदा आहेर यांच्याकडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यांनी यावेळी संपूर्ण घटनेवर भाष्य करत तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायावर सडकून भाष्य केले आहे.

Chandwad-Deola | मंत्रीपदाची अशी हाव की भावाच्याच पाठीत घातला घाव..?

17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माघार घेण्याचे कारण काय…?

यावेळी बोलताना, “त्यांनी मला माझ्या भावाने….माझ्या पक्षाने..न्याय दिला नाही. आता मी जनतेच्या न्यायालयात आलो आहे की, जनता मला न्याय देणार आहे.” असे म्हणत भावनिक देवळ्यातील जनतेलि भावनिक साद घातली आहे. तसेच, ‘2014 ला ठरवले होते की, यावेळेस राहुलला आमदार करायचे व पुढच्या वेळेस तू.’ मी आदरणीय बाबांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यानंतर 2019 ला पक्षाने सांगितले की तू थांबून घे. मी तेव्हाही थांबलो. आता 2024 ला काय अडचण आहे….? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. पुढे बोलत, “बावनकुळे यांनी यादी जाहीर झाली तेव्हा पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांना कल्पना दिली होती. मग जर यांना आधीच माहिती होतं की आपल्याला उमेदवारी मिळणार आहे. मग 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माघार घेण्याचे कारण काय…? तुम्हीच सांगा माझा विश्वासघात झाला आहे की नाही..?” असं जनतेला सवाल करत आपली खंत बोलून दाखवली.

Keda Aaher | केदा आहेरांचा मोठा गौप्यस्फोट; राहुल आहेरांना ‘कपटी’ म्हणत धू धू धुतलं

केदा आहेरांचे जनतेला आश्वासन

तसेच “मी एवढा वाईट आहे का..? माझा पक्ष मला सांगतो की, म्हणे तुझं नाव सर्व्हेत नाही. हा सर्व्हे आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मी अजूनही पक्षाला आणि माझ्या भावाला सांगतो की, त्यांनी जनतेचा कौल ओळखावा. मी आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चांदवड देवळा तालुक्यात रामराज्य आणेल.” असे म्हणत पक्षाला व जनतेला आश्वासन दिले. केदा आहेर यांच्या देवळा तालुक्यात कार्यकर्ता संवाद मेळावा जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला असून केदा आहेरांनी देवळ्याच्या जनतेला भावनिक साद घातली आहे. त्याचबरोबर, “सोमवारी किंवा मंगळवारी फॉर्म भरू. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तारीख कळवले जाईल. देवळा-चांदवडमध्ये पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण झाले. येथे विकासाच्या मुद्द्यावर राजकारण का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी जनतेला केला. “मी आमदार झाल्यावर येथे नियमित जनता दरबार भरेल, पाण्याचा प्रश्न, एमआयडीसी, महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी माझा प्रयत्न असेल.” असे म्हणत देवळ्याच्या जनतेला आश्वासित केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here