Kartik Amavasya | आज ह्या वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजेच ‘कार्तिक अमावस्या’ आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, ह्या वर्षातील शेवटची अमावस्या ही आज असून, ह्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला कार्तिकी अमावस्या म्हणतात.
अमावस्येच्या दिवशी स्नान, दान तसेच उपासना केल्याने विशेष लाभ होत असतो. ह्या वर्षातील शेवटची अमावस्या ही मंगळवारी असून हिंदू शास्त्रानुसार, जी अमावस्या मंगळवारी येते तिला ‘भौमवती अमावस्या’ ही म्हटलं जातं. या शेवटच्या अमावस्येला पुढील प्रकारे विशेष पूजा केल्याने तुमचे येणारे वर्षी संकटांपासून दूर राहण्यास तसेच पुढील वर्ष हे सुख-समृद्धीचं तसेच भरभराटीचं जाण्यास मदत होते.
ह्या कार्तिकी अमावस्येला पितृपूजन, स्नान, तसेच पिंडदानाला विशेष महत्त्व दिलेले आहे. ह्या अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळते, असे सांगण्यात येते. त्यामुळे अगदी पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी ह्या अमावस्येला महत्त्व आहे. सोबतच ह्या आमवास्येच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील मोठमोठ्या अडचणी ह्या दूर होतात, तसेच आर्थिक अडचणीही दूर होतात.
Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…
ह्या अमावस्येचे महत्त्व
पुढील वर्षी कर्जमुक्ती मिळावी या साठी आजची कार्तिकी अमावस्या ही आजची तिथी अत्यंत शुभ समजली जाते. ह्या दिवशी पूजा, दान तसेच नदीत स्नान केल्यामुळे पुण्य मिळतं. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील ह्या कार्तिकी अमावास्येला देवी लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यामुळे अनेक गंभीर पापांपासूनही मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. ह्या कार्तिक अमावस्येला आपण पितरांना तर्पण-अर्पण करण्याची परंपरा ही आजूनही पाळली जाते.
दरम्यान, आजच्या ह्या कार्तिकी अमावस्येला केलेल्या पूजेमुळे आपल्या पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळते आणि त्यांचा आपल्याला विशेष आशिर्वाद देखील मिळतो, असे सांगितले जाते. ह्या दिवशी तर्पण तसेच पिंडदान करण्याचे महत्त्व आहे. कार्तिकी अमावस्येचे हे विशेष पूजन केल्याने येणाऱ्या वर्षातील संकटे आणि समस्या संपुष्टात येऊन पुढील वर्षभरात तुम्हाला सुख-समृद्धी तसच ऐश्वर्य मिळते.
भौमवती अमावस्या हनुमानाच्या प्रभावाखाली आहे, त्यामुळे ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी भौमवती अमावस्येदिवशी हनुमानाची पूजा करावी, यामुळे विशेष लाभ मिळतो. भौमवती अमावस्येच्या दिवशी दान आणि पूजा केल्याने नकारात्मक शक्तींचाही नाश होतो.
Spiritual news | असे आहे कालभैरव जयंतीचे महत्त्व; वाचा सविस्तर
कधी आहे अमावस्या..?
दिनांक – १२ डिसेंबर २०२३ , वार – मंगळवार
असा आहे शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक अमावस्या ही आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी सकाळी ६.२४ वाजता सुरू होणार असून, १३ डिसेंबर रोजी पहाटे ५.०१ वाजता समाप्त होणार आहे.
अशी आहे शुभ वेळ
आज पहाटे५:१४ ते संध्याकाळी ६:४३ पर्यंत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम