Nashik News | नामपूर मधील स्मशानभूमीत आढळले करणीचे साहित्य आणि तरुणांचे फोटो

0
21

Nashik News | साक्री रस्त्यालगतच असणाऱ्या एका स्मशानभूमीत अंधश्रद्धा व लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रकार रविवार (दि. १९) रोजी समोर आला आहे. एका काळ्या रंगाच्या कापडात अघोरी विद्येसाठी लागणारे साहित्य आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी संबंधितांचा शोध घेत अंधश्रद्धा निर्मूलन ह्या कायद्यान्वये कारवाई करण्याची, मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. नामपूर येथील ह्या स्मशानभूमीत लोकांच्या सहभागातून झाडांना दगडी ओटे बांधण्याचे व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

त्याची पाहणी करण्यासाठी रविवार (दि. १९) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नारायण सावंत, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कमलाकर सोनवणे, संजय सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव, मेघडीप सावंत हे येथे आले असता हा अघोरी विद्येचा प्रकार समोर आला आहे.

Nashik news | शिवमहापुराण कथेसाठी हजारो खान्देशवासीयांचा नाशिकमध्ये मुक्काम

या साहित्यात काळ्या कपड्यात सात चंदनाच्या काड्या काळ्या धाग्याने बांधलेल्या होत्या. तर काही तरुणांच्या पासपोर्ट फोटोच्या छायाचित्रांना कुंकू, लाल रंग लावण्यात आलेला होता.

कोहळ्याला टाचणीच्या सहाय्याने टोचण्यात आले होते आणि त्याच्यावरही कुंकू लावलेले होते. छायाचित्रांमध्ये असलेले तरुण कोण आहे, हा सर्व प्रकार काय आहे, कोणी केला, या सर्व प्रकरणाचा शोध हा पोलिसांनी लावावा, ही मागणी नागरिकांनी केली आहे.

jalna | अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here