मालेगाव | देशात कुठल्याच क्षेत्रात महिलांची कमी नाही आहे. खडतर अशा समजल्या जाणाऱ्या संरक्षणाच्या क्षेत्रातही आता महिला पुढे यायला सुरुवात झाली आहे. सोयगाव भागातील कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून योगिता आण्णा देवरे हीने भारतीय नौदलाची परिक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवेत दाखल झालेली आहे. सैन्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अग्निवीरांच्या भरतीमध्ये मुलींनाही संधी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे सैन्य दलासारख्या अवघड अशा सेवेत महिलांनी जाणे याबाबत असलेल्या अज्ञानपणास फाटा देऊन मालेगावच्या योगिताने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरलेली आहे.
धुळ्यात शिवमहापुराण कथेत चोरट्यांची दिवाळी; तिघांना शिताफीने अटक
योगिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीत ८८ % तर बारावीत ७७ % मिळवून उत्तीर्ण झालेल्या योगिताने बारावीनंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. देशसेवेची ओढ असल्याने आपण वेगळं काही तरी करू शकतो या भावनेने मुंबईत अग्नीवीर परिक्षा दिलेली आहे. ओरिसा राज्यातील INS चिल्खा सेंटर येथे प्रशिक्षणासाठी गुरूवारी (दि. १७) रुजू झाली आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर महिला अग्निवीर म्हणून देश रक्षणासाठी ती सज्ज होणार आहे.
योगिताने जिद्द तसेच चिकाटीच्या जोरावर सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत हे सिद्ध करून दाखविलेले आहे. हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून, आई-बापाच्या कष्टाचे चीज करत ही यशाची पताका योगिताने फडकावली आहे. वडील आण्णा दामू देवरे हे निवृत्त जवान आहेत तर आई मंगल गृहिणी असून शेतीकामात कुटुंबियांना मदत करतात. देवरे कुटुंबिय मूळचे तालुक्यातील तळवाडे (ता. मालेगाव) येथील रहिवाशी आहेत. योगिता जिल्ह्यातील पहिली अग्नीवीर होत भारतीय नौदलात मालेगाव तालुक्याचा झेंडा रोवला त्याबद्दल सर्वत्र तीचे कौतुक होत आहे.
Diwali 2023 | तयार फराळ विक्रीतून बाजारपेठेत चैतन्य! कसमादे पट्ट्यात झाली मोठी उलाढाल
अग्निवीर भरतीमध्ये निवड होणारी भारतातील पहिली तरुणी कोण?
‘हिशा बघेल’ मूळची छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावची रहिवासी हिशा बघेल ही 2023 च्या अग्निवीर भरती होणारी पहिली तरुणी आहे. हिशाचे प्रशिक्षण देखील ओडिसातील चिल्खा येथे झाले आहे. हिशा ही एका रिक्षाचालकाची मुली असून पहिली महिला अग्निवीर होण्याचा बहुमान तिने मेहनत तसेच हिंमतीच्या जोरावर मिळवलेला आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे तसेच तिच्या वडिलांची बारा वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम