देवळा तालुक्यात ठिकठिकाणी गारा उन्हाळ कांदा संकटात

0
1
चिंचवे ता देवळा येथे काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्यावर पडलेल्या गारा (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : आज तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास देवळा शहरासह , वाजगाव ,खर्डे तसेच उमराणे, सांगवी, कुंभार्ड परिसरातील चिंचवे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. चिंचवे येथे तुफान तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणत गारा पडल्या .

चिंचवे ता देवळा येथे काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्यावर पडलेल्या गारा (छाया – सोमनाथ जगताप )

यामुळे कांद्याचे नुकसान होणार आहे. तर रविवारी देवळा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक अवकाळी पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे कांदा इतर पिकाना याचा फटका बसणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे. नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा तसेच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा ,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here