नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar Jayanti 2024) यांच्या जयंती निमित्ताने नाशिकमध्ये साक्षी गणेश मंदिर परिसरात कालीचरण महाराजांचे (Kalicharan Maharaj) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना “या जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व काही भोगून घ्या, सर्व चांगल्या फुलाचा वास घ्या. कारण हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र त्या ईश्वराचा आनंद कधी संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले. दरम्यान, यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
“मी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतही बोलतो. पण माझे शिक्षण काही झालेले नाही. मी शाळा शिकलेलो नसून, मी एक अंगुठा छाप आहे. मला एक पत्रकार बोलले की आपण फक्त एक माणूस म्हणून जगू शकत नाही का..? ज्यात धर्म नाही तो काय ढोर आहे. खाणे, पिणे, झोपणे हे सर्व पशुचे लक्षण आहे. जे एक पशू करतो तेच माणूसही करतो. भारत हिंदू राष्ट्र झाले का..? आपई जी मंदिरं फोडलीत ती पुन्हा झाली पाहिजेत का..? लव्ह जिहाद हे बंद झाले पाहिजे का..? त्याविरोधात कठोर कायदा झाला पाहिजे का? ८८ हजार महर्षी लोक आहेत आणि त्यात एक माझे गुरू आहेत. त्यांनीच श्रीरामाला धनुष्य ही दिले होते”, असेही यावेळी कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) म्हणाले.
Brijshushan sharan singh | भाजप खासदाराच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने दोघांना चिरडले
Kalicharan Maharaj | जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या
प्रत्येक धर्माची एक वेगळी व्याख्या आहे. ईश्वराकडे तुम्ही सर्वाधिक श्रेष्ठ वस्तू ही मागितली पाहिजे. अनंत सुखानंद म्हणजेच ईश्वर हा सच्चिदानंद आणि परमात्मा आहे. या सगळ्या दुःखांचा पर्मनंट नाश होणार आहे. आपण काही शरीर नव्हे तर एक आत्मा आहोत. असा आनंद हवा की, ज्यात दुःख व्हायला नाही पाहिजे. आपण शरीर नाही, आत्मा आहोत. या जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, हे सर्व भोगून घ्या, तुम्ही चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचाही सुगंध घ्या. कारण हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद कधीही संपणार नाही”, असं यावेळी बोलताना कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) म्हणाले.
Raj Thackeray | महायुतीत बिनसलं; राज ठाकरे विधासभेपूर्वी भाजपला देणार मोठा धक्का..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम