नाशिक | दिवाळीमुळे सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील भालेराव आणि जाधव कुटुंबावर ऐन दिवाळीच्या तोंडावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. दोन्ही कुटुंबातील अल्पवयीन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या युवतींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी देवा भालेराव या 16 वर्षीय युवतींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Gold Silver Rate | धनत्रयोदशीला सोने-चांदी स्वस्त
कशी घटली दुर्घटना?
पूजा अशोक जाधव, खुशी देवा भालेराव आणि कावेरी भालेराव या तिघी मैत्रिणी नेहमी प्रमाणेच कपडे धुण्यासाठी गावातील बंधाऱ्यावर गेल्या होत्या. चिंचविहीर गावाजवळ असलेल्या के. टी. बंधाऱ्यावर त्या कपडे धुवत असताना अघटित घडले. पूजा जाधव आणि खुशी भालेराव या दोघींचा अचानक पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच कावेरीनेदेखील तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, तिला त्या दोघींना वाचवण्यात अपयश आले.
Nashik news | नाशिक मधील ४६ महसूल मंडळे दुष्काळी म्हणून घोषित
गावकऱ्यांची घटनास्थळी तातडीने धाव
दरम्यान कावेरीने आरडाआरोड करण्यास सुरूवात केली आहे. ही सर्व बाब ग्रामस्थांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तिन्ही तरुणींना वाचवण्याचा प्रयत्नही केला. ज्यावेळी या तिन्ही तरुणींना बाहेर काढले गेले त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी पूजा आणि खुशी यांना मृत घोषित केलं आहे. तर कावेरीवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम