सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर आता देवळा तालुक्यातील जनतेला कार्यकाळ संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागले आहे . तालुक्यातील लोहोनेर जि.प गटातील सदस्य धनश्री आहेर, उमराणे जि.प गटातील सदस्य यशवंत शिरसाठ, वाखारी जि.प गटातील सदस्य डॉ. नूतन आहेर यांचा तर पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, माजी सभापती केशरबाई अहिरे, उपसभापती धर्मा देवरे, माजी उपसभापती सरला देवरे, सदस्या सुरेखा निकम, कल्पना देशमुख यांचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्ष होत आले आहेत. या ना त्या कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे.
या निवडणुकांसंदर्भात येत्या २५ तारखेला न्यायालयात सुनावणी होणार असून, लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका संपल्याने राज्य सरकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घोषित करतील अशी आशा बाळगून इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून, इच्छुक उमेदवारांनी गटातील गावातील प्रमुख राजकीय मंडळींना भेटून आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. यात वाखारी जि.प गटात देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, माजी सभापती अरुण आहेर, मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, मविप्र संचालक विजय पगार, खाजगी बाजार समितीचे अध्यक्ष सुनील आहेर, माजी सदस्या डॉ. नुतन आहेर, अंकुश सोनवणे, श्रेया पवार (जैन) आदींचा समावेश आहे.
तर लोहोणेर गटात अजय आहिरे, आण्णा पाटील शेवाळे, बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे तालूका अध्यक्ष पंडितराव निकम आदी तर उमराणे गटात उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मा देवरे, प्रसिध्द कांदा व्यापारी सुनील देवरे, शिवसेनेचे देवानंद वाघ, बापू जाधव, माजी सदस्य यशवंत शिरसाठ आदींचा समावेश आहे. दरम्यान, ह्या सुनावणी नंतर निवडणूका घेण्याचा निर्णय झाल्यास नवीन आरक्षण पडणार असल्याचे सांगितले जात असून, तसे झाल्यास इच्छुकांचा हिरमोड होऊ शकतो. यामुळे इच्छुकांच्या नजरा आता सुनावणी व आरक्षणाकडे लागून राहिले आहे. यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय धुरळा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तद्याप इच्छुकांनी गट, गणात निवडणुकीसाठी गुडग्याला बाशिंग बांधले आहे.
गट व गणातील गावे
१. उमराणे गटातील गावे – उमराणे, तिसगांव, गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, वऱ्हाळे, म. फुलेनगर, मेशी, दहिवड, पिंपळगाव, चिंचवे, श्रीरामपूर (एकूण १२ गावे)
२. उमराणे गणातील गावे – उमराणे, तिसगाव, गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, वऱ्हाळे, म. फुलेनगर
३. मेशी गणातील गावे – दहिवड, पिंपळगाव, चिंचवे, श्रीरामपूर, रामनगर
४. वाखारी गटातील गावे – वाखारी, भिलवाड, गुंजळनगर, रामेश्वर, खुंटेवाडी, कापशी, भावडे, सुभाषनगर, फुले माळवाडी, विजयनगर, खर्डे, वाजगाव, वडाळे, सटवाईवाडी, मटाने, कनकापूर, कांचने, वार्शी, हनुमंतपाडा, वरवंडी, माळवाडी, शेरी (एकूण गावे – २२)
५. वाखारी गणातील गावे – वाखारी, भिलवाड, गुंजळनगर, रामेश्वर, खुंटेवाडी, कापशी, भावडे, सुभाषनगर, फुले माळवाडी, विजयनगर
६. खर्डे गणातील गावे – खर्डे, वाजगाव, वडाळे, सटवाईवाडी, मटाने, कनकापूर, कांचने, वार्शी, हनुमंतपाडा, वरवंडी, माळवाडी, शेरी
७. लोहोणेर गटातील गावे – लोहोणेर, विठेवाडी, झिरेपिंपळ, भऊर, सावकी, खामखेडा, खालप, महालपाटणे, देवपूरपाडे, डोंगरगाव, निंबोळा, वासोळ, फुलेनगर, खडकतळे (एकूण गावे – १४)
८. लोहोणेर गणातील गावे – लोहोणेर, विठेवाडी, झिरे पिंपळ, भऊर, सावकी, खामखेडा
९. खालप गणातील गावे – खालप, महालपाटणे, देवपूरपाडे, डोंगरगाव, निंबोळा, वासोळ, फुलेनगर, खडकतळे या गावांचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम