Jansanman Yatra | वडिलांकडून लपवाछपवी अन् लेक म्हणतो माझी उमेदवारी पक्की..?; झिरवाळ पितापुत्रांचं काही कळेना..!

0
42
Jansanman Yatra
Jansanman Yatra

नाशिक :  आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात ही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदार संघातून होत आहे. पुढील चार दिवस अजित पवार नाशिकमध्ये मुक्कामी असून, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व विदर्भ असा या जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे.

दरम्यान, जनसन्मान यात्रेची (Jansanman Yatra) ही सभा आज दिंडोरीत (Dindori) पार पडली. मात्र, या सभेत सर्वाधिक चर्चा राहिली ती विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या मुलाची. जयंत पाटील यांच्या निष्ठावंतांच्या मेळव्याला हजेरी लावणारे गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे आज अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला उपस्थित नव्हते. यामुळे पुन्हा एकदा गोकुळ झिरवाळ शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Ajit Pawar In Nashik | नाशकात दादांचा मोठा डाव; शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला..?

वडिलांकडून लपवाछपवी; लेक म्हणतो माझी उमेदवारी पक्की..?

जयंत पाटील यांच्या नाशिक दौऱ्यावेळी निष्ठवंतांच्या मेळाव्याला गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थिती लावत वडीलांविरोधात दंड थोपटले होते. तर, मी शरद पवार गटातच असून, माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील. तसेच आपल्याला पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण वडिलांविरोधातही दिंडोरी विधानसभेतून निवडणूक लढवू, असे ते म्हणाले होते. मात्र,  यानंतर नरहरी झिरवाळ यांनी “मी अजित पवारांसोबतच राहणार असून, गोकुळ झिरवाळ हा माझा मुलगा आहे आणि जर त्याला आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेन. मी त्याचा बाप आहे तो माझा नाही”, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले होते.

Nashik Vidhansabha | युवा पिढीलाही आमदारकीचे डोहाळे; नाशिकमधील ‘या’ मतदारसंघांत बाप-लेकातच लढत..?

मी शरद पवारांसोबत; लेकाने पुन्हा वडिलांविरोधात दंड थोपटले 

दरम्यान, आजच्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेकडे नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांनी पाठ फिरवली. तर, गोकुळ झिरवाळ यांनी मध्यमांशी बोलताना मी शरद पवारांसोबतच असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुक लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे नरहरी झिरवाळ सध्या जरी लपवत असले. तरी लेकाने वडिलांविरोधात दंड थोपटल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात दिंडोरीत मुलगा विरुद्ध वडील अशी लढत होणार का..? हे पहावे लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here