द पॉईंट नाऊ ब्युरो : बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज द्यावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँकांना दिल्या आहेत. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून, खरीप हंगामासाठी पीक कर्ज शेतकऱ्यांना आवश्यकता असल्याने, मुख्यमंत्र्यांनी या सूचना बँकांना दिल्या आहेत.
शेतकरी वर्गाला शेतीसाठी कर्जाची आवश्यकता असते. मात्र ते भेटण्यात, त्याची अंमलबजावणी होण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे शेतकरी वर्गाची गरज ओळखून बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन बँक मेळावे आयोजित करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने, शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची अडचण नको, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी या सूचना केल्या आहेत. आता बँका याची अंमलबजावणी कशी आणि कधी सुरू करणार, याची शेतकरी वर्ग वाट पाहत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम