Skip to content

एका षटकात ३५ धावा; बुमराहने रचला कसोटीत वर्ल्ड रेकॉर्ड


दिल्ली – एग्बस्टनमध्ये कालपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला चांगलेच धुतले. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये तब्बल ३५ धावा कुटत एक नवा इतिहास बनवला. विशेष म्हणजे ह्या ओवरमध्ये एक वाईड व नो बॉलसह बुमराहने एकूण ५ चौकार, २ षटकार ठोकले.

पहिल्या डावात ऋषभ पंत व रवींद्र जडेजाच्या शतकीय खेळीनंतर १० व्या क्रमांकावर उतरताना बुमराहने डावाची ८४ वी ओव्हर ब्रॉड करताना त्याने ४,४,६,४,४,४,६,१ अश्या धावा करत अवघ्या १६ चेंडूत ३१ धावा केल्या. भारताचा डाव ४१६ मध्ये आटोपला.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!