देवळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन

0
26

देवळा | ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती मिळावी. तसेच किमान वेतन देण्यात यावे, या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभर संगणक परिचालकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे. मागील 12 वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागानं नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रमाणिकपणे करत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत आहेत. दरम्यान, याबाबत सर्व संगणक परिचालकांनी एकत्र येत देवळा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

देवळा | सुभाषनगर येथे २३ वर्षानंतर भरला दहावीचा वर्ग

ग्रामपंचायतीचे ऑनलाईन आणि ऑफलाईन तसेच इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करुनसुद्धा केवळ 6 हजार 930 हजार रुपये हे या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन मिळत आहे. तेही केव्हाच वेळेवर मिळत नसल्याची माहिती संगणक परिचालकांनी सांगितली आहे. संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीमध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने 2018 मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे. त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन देण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दरम्यान सर्व मागण्यांसदर्भात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या सुचनेनुसार संगणक परिचालक संघटना देवळा तालुक्याच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

मालेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! तालुक्याची कन्या जिल्ह्यातील पहिली अग्निवीर जवान

नेमक्या मागण्या काय?

  • ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देणे.
  • संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत 20000 रुपये मासिक मानधन द्यावे.
  • नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी.
  • पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे . त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मागील सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही, त्यांना त्वरित मानधन अदा करणे.

अशा प्रमुख मागण्या यावेळी संगणक परिचालकांनी केलेल्या आहेत. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने संगणक परिचालक उपस्थित होते. यावेळी संगणक परिचालक संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष देवाजी सावंत, सचिव भीमराव अहिरे, खजिनदार समीर बच्छाव आदींसह मोठया संख्येने संगणक परिचालक उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here