Mumabi : राज्यामध्ये पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईने जोर धरला आहे. आज सकाळी मुंबईमध्ये पंधराहून अधिक ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीने छापेमारी करण्यात आली.
यामध्ये कोविड काळात लाईफ लाईन कंपनीने घोटाळा केला असल्याच सांगत लाईफ लाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणी ईडी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे. यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सनदी अधिकारी संजय जैस्वाल यांच्या निवासस्थानी तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडी कडून धाड टाकण्यात आली.
सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत त्यांच्या केके ग्रँड या चेंबूर मधील इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये हा छापा टाकण्यात आला असून सध्या त्यांच्या घरी पाच जणांच्या अधिकाऱ्यांचे पथक चौकशी करत आहे. निवडणुकांमध्ये ठाकरे गटासाठी पडद्यामागची सूत्र सांभाळत असल्याची चर्चा आहे. तर चव्हाण यांचा मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईमध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात असून ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या सुजित पाटकर यांच्या वर कोविड काळात लाईफ लाईन कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केला असल्याचा आरोप मंत्री किरीट सोमय्या यांनी केला होता. याच अनुषंगाने आता पिढी तपास करत असून जवळपास पंधरा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
काय आहे लाइफलाइन घोटाळा प्रकरण
कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये अनेक कोरोना सेंटर उभारण्यात आले होते. यात मुंबईमधील दहिसर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं कोविड केंद्र हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या उद्योगपती सुजित पाटकर यांनी बांधलं असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रात्रीतून कंपनी देखील उभी केली आणि त्या कंपनीला लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस असं नाव देण्यात आलं असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान 242 ऑक्सीजन बेड्सच्या क्षमतेसह हे कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं तर दहिसर केंद्रामध्ये 120 रेग्युलर बेड स्थापन करण्यात आले होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि हे कॉन्ट्रॅक्ट चालवण्यासाठी 2020 मध्ये पाटकर यांनी डॉक्टरांसोबत करार केला आणि बीएमसी ने हे कंत्राट त्यांना दिलं. दरम्यान पाटकर यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय यांना एक महत्त्वपूर्ण दस्तावेत सापडला असल्याचं बोललं जात आहे याच आधारावर हा आरोप करण्यात येत असून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर लाईफ लाईन कंपनीच्या खात्यामध्ये जवळपास 32 कोटी रुपये जमा झाले होते आणि कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. यातच कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी करत असताना कोट्यावधीचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक पणे हे धाडसत्र जवळपास 15 ठिकाणी राबवण्यात आलं असून यामध्ये उपस्थितांपैकी कुणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत येण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या ठिकाणी मोबाइल वापरण्यास देखील मनाई करण्यात आली असल्याचं समोर येत आहे. दरम्यान आता या कारवाई मध्ये नेमकं काय समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम