Deola | तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई असतांना शासनाने देवळा तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आलेला आहे. याचा देवळा तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. २) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी, स.पो.नि. दीपक पाटील यांना देण्यात आले आहे.
मराठा आरक्षण | देवळातील तिसगांव येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु
निवेदनाचा आशय असा की, यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्य वृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेलेला आहे. त्यात नदी नाले, छोटे-मोठे पाझर तलाव कोरडे ठाक पडली आहेत. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून तालुक्यात काही गावांत भर पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता यात आणखी भर पडली असून प्रशासनाकडे टँकरची मागणी सुरु झालेली आहे. असं असतांना राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जिल्हातील मालेगांव, येवला आणि सिन्नर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहेत. मात्र देवळा या तालुक्यांपेक्षाही भयावह परिस्थितीत असून या तालूक्यातील बहुतांश गावात दिवसाआड तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून पशुपालक मिळेल तेथून आणि मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. असं सगळं सुरू असतांना राज्य शासनाने देवळा तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र नाराजीचा सूर उमटला असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे.
Nashik News | नांदगाव, चांदवड-देवळा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार मैदानात…
यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, उपतालुका प्रमुख विलास शिंदे, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुका संघटक विजय आहेर, उप शहरप्रमुख सोमनाथ शिंदे, गणप्रमुख सुनील शिंदे, जितेंद्र भामरे, विभाग प्रमुख गोरख गांगुर्डे, खंडू जाधव, सुनील शिंदे, किरण जाधव, भूषण गोराणे, बाबाजी माळी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम