Deola | विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘श्रीमान दोस्ती नागरी सहकारी पतसंस्थे’चे उद्घाटन

0
44

Deola | पतसंस्थेचे नाव दोस्ती असले तरी व्यवहारात दोस्ती असू नये यामुळे चांगले संबंध खराब होण्याची भीती असते. देवळा शहरातील सर्वच पतसंस्थाची आर्थिक परिस्थिती सदृढ असून नव्याने सुरू होत असलेल्या ‘दोस्ती नागरी सहकारी पतसंस्था’ देखील लवकर वटवृक्षात रूपांतर करेल असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी केले.

लवकरचं पुन्हा एकदा नोटबंदी होणार? …त्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटा बदलुन घ्या!

देवळा येथे मंगळावर (दि. २४) रोजी विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर नव्याने सुरु होणाऱ्या ‘श्रीमान दोस्ती नागरी सहकारी पतसंस्थे’चे उद्घाटन भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केदा आहेर बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. राहुल आहेर,  महंत ब्रह्मचारी माधवदासजी महाराज, कीर्तन केसरी ह.भ.प. संजय (नाना) धोंडगे, कौतिक हिरे, सहकार अधिकारी वसंत गवळी, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्र संचालक विजय पगार, प्रचार्य हितेंद्र आहेर,नगराध्यक्षा, सुलभा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर ,बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, दिलीप पाटील, गटनेते संभाजी आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, प्रतिष्ठित कांदा व्यापारी रमेश मेतकर, प्रवीण मेधने आदी मान्यवर उपस्थित होते.

NMC Hospital Recruitment | दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा प्रतिसाद नाहीच! कारण नक्की काय?

यावेळी महंत ब्रह्मचारी माधवदासजी महाराज यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संस्थेचे मुख्य प्रवतर्क दशरथ पुरकर, चेअरमन देविदास हिरे, व्हा. चेअरमन योगेश (नानू) आहेर, संचालक सर्वश्री निलेश गुंजाळ, बापू जाधव, शांताराम आहेर, दिनकर निकम, धर्मेंद्र आहेर, ताकदीर कापडणीस, विलास माळी, भरत आढाव, आशा पवार, दीपाली जाधव आदींसह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक भगवान आहेर यांनी केले तर आभार प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here