Gram Panchayat Elections Result | नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या २०० सदस्य जागांसाठी तर ४४ थेट सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून, सकाळपासून मतमोजणी सुरु होती. पैकी ३ बिनविरोध निवड झाली आहे. तर एका ठिकाणी अर्जच दाखल झाला नव्हता. निवडणुकांमुळे सर्वच स्थानिक पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बघूयात कुठल्या तालुक्यात कोणाचा गुलाल
(मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण, येवला या तालुक्यांचा कौल हाती आलेला आहे. ग्रामपंचायत आणि विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे )
१. मालेगाव
मांजरे – सिमा अनिल निकम, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
• मालेगाव एकूण जागा – ०१
राष्ट्रवादी (अजित पवार गट ) – ०१
२. कळवण
सरलेदिगर – सुमतीलाल बागुल, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
कोसवन – संदीप भोये, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
कड़की – उत्तम भोये, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
देसगाव – जिजाबाई बागुल, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
करंभेळ – भगवान गावित, राष्ट्रवादी (अजित पवार)
crime news | मतदानाला आला, म्हणून चाकूने केला हल्ला
• कळवण एकूण जागा – ०५
राष्ट्रवादी (अजित पवार गट ) – ०५
३. देवळा
मेशी – बापूसाहेब जाधव, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
माळवाडी – लंकेश बागुल, (भाजप)
फुलेमाळवाडी – अल्काबाई पवार, (भाजप)
• देवळा एकूण जागा – 0३
ठाकरे गट – ०१ भाजप – ०२
४. बागलाण
चिराई – शंकूतला पाटील, (भाजप)
भवाडे – पंडित अहिरे, बिनविरोध (भाजप)
केळझर – अनिल बागुल, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
भाक्षी – चेतन वणीस, (अपक्ष)
मुळाणे – संदीप कृष्णा निकम, (शेतकरी पक्ष)
केरसाणे – फुलाबाई साहेबराव माळीस, (अपक्ष)
जामोटी – वंदना पोपट ठाकरे, (भाजप)
तताणी – गजानन पंडित ठाकरे, (अपक्ष)
• बागलाण एकूण जागा – ०८
भाजप – ०३ अपक्ष – ०४ ठाकरे गट – ०१
Chhagan Bhujbal | भुजबळांची अंतरवालीतून घोषणा; अंबडमध्ये ओबीसींचा महामोर्चा
५ . येवला
लौकी शिरस – प्रदीप रमेश कानडे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
शिरसगाव लौकी – ज्ञानेश्वर रामदास शेवाळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
• येवला – एकूण जागा – ०२
राष्ट्रवादी (अजित पवार गट ) – ०२
अजूनही जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीचा निकाल बाकी असून, काही तासांत सर्व निकाल आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कोण भारी हे स्पष्ट होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम