Malegaon | मी तुरुंगातून निवडणूक लढवेल, पण भुसेंचा पराभव करणारच

0
32

Malegaon | नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा धसका घेऊन माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात षडयंत्र रचले आहे. पण, मी तुरुंगात गेलो तरी, तुरुंगातून उमेदवारी करून दादा भुसेंचा पराभव करेन, असे शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे बोलले आहेत.

शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे व जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यातील राजकारण हे टोकाला गेले आहे. या पार्श्वभूमीवर हिरे यांनी भुसे यांना थेट आव्हान देत, मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केले आहे.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे, मालेगाव मतदारसंघातील राजकारणाचा अक्षरशः वणवा पेटू लागला आहे. मतदारसंघात पारंपरिक हिरे विरुद्द भुसे यांच्या राजकीय वादातून मागच्या आठवड्यात हिरे यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पालकमंत्री भुसे यांनी आपल्या विरोधात षडयंत्राचा भाग म्हणून आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप डॉ. अद्वय हिरे यांनी केला आहे.

Winter Update | दिवाळीत नाशिककर गारठणार! तापमानात होणार 2 अंशांनी घट

दरम्यान, याप्रकरणी हिरे समर्थकांनी मालेगावात मोर्चा काढून भुसे यांना आव्हानदिले आहे. ह्या मोर्चाला मतदारसंघातील हिरे समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यामुळे मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणी आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोपांचे सत्र सुरू ठेवले आहेत.

दरम्यान, हिरे यांनी फेसबुकवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी विधानसभेची निव़डणूक टाळण्यासाठी पालकमंत्र्यांचे हे षडयंत्र आहे. माझ्या अर्धांगवायू झालेल्या ७० वर्षांच्या वडिलांना तुरुंगात टाकून निवडणूक टाळण्याचा त्यांचा डाव आहे, पण तो मी यशस्वी होऊ देणार नाही. मी तुरुंगातून उमेदवारी अर्ज दाखल करेन पण, भुसेंचा पराभव करीनच, असे थेट आव्हान हीरे यांनी या व्हिडिओतून भुसे यांना दिले आहे.

या षडयंत्रात मंत्री दादा भुसे यांचा हात आहे. ड्रग्स प्रकरणावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करूच. हिरे कुटुंबीयांवर सूड भावनेने खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र थांबवले नाही तर, येणाऱ्या काळात आम्ही बिऱ्हाड आंदोलन उभारू, असा इशारा शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हा समन्वयक पवन ठाकरे आदींसह इतर उपस्थित नेत्यांनी दिला. एकंदरच यातून मालेगाव मतदारसंघातील राजकारण तापले असल्याचे दिसत आहे.

Crime News | अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here